भारतासमोर १३२ धावांचे आव्हान!

भारत- ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ १९.४ षटकात १३१ धावांवर गारद झाला. भारताकडून क्षेत्ररक्षकांनी नेत्रदीपक कामगिरी करत चार ऑस्ट्रेलियन खेळाडूंना तंबूत पाठविले. तर प्रविण कुमार आणि राहुल शर्मा यांनी प्रत्येकी दोन तर विनय कुमार आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Updated: Feb 3, 2012, 06:09 PM IST

www.24taas.com, मेलबर्न

भारत- ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ १९.४ षटकात १३१ धावांवर गारद झाला. भारताकडून क्षेत्ररक्षकांनी नेत्रदीपक कामगिरी करत चार ऑस्ट्रेलियन खेळाडूंना तंबूत पाठविले.  तर प्रविण कुमार आणि राहुल शर्मा यांनी प्रत्येकी दोन तर विनय कुमार आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

ऑस्ट्रेलियाकडून फिन्च यांना सर्वाधिक ३६ धावा केल्या. त्याला वॅड (३२) आणि डेव्हिड हसी (२४) यांनी चांगली साथ दिली मात्र, इतर ऑस्ट्रेलियन संघाने निराशा केली. भारताकडून क्षेत्ररक्षकांची कामगिरी जबरदस्त होती.

मेलबर्न टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॉलर्सनी जबरदस्त बॉलिंग केली आहे. फास्ट आणि स्पिनर्सनी कांगारु बॅट्समनना चांगलाच दणका दिला आहे. भारतीय बॉलर्सनी कांगारू बॅट्समना स्थिरावण्याची संधीच दिली नाही. बॉलर्सच्या चमकदार कामगिरीमुळे भारताची पराभवाची मालिका अखेर या मॅचमध्ये संपुष्टात येईल अशी आशा आहे.