पहिली टेस्ट रंगतदार अवस्थेत

दिल्ली टेस्टमध्ये धडाक्यात सुरुवात केल्यानंतर टीम इंडियाची चांगली पडझड झाली. भारतीय टीम 209 रन्सवर ऑल आऊट झाली. वेस्ट इंडिजनं 95 रन्सची महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे. दरम्यान, 89 रन्सवर भारताची पहिली विकेट गेली. आणि त्यानंतर विंडीज बॉलर्सनी 7 वर 154 अशी बिक्ट अवस्था टीम इंडियाची करुन टाकली.

Updated: Nov 7, 2011, 05:59 PM IST

झी २४ तास वेब टीम, दिल्ली

 

दिल्ली टेस्टमध्ये धडाक्यात सुरुवात केल्यानंतर टीम इंडियाची चांगली पडझड झाली. भारतीय टीम 209 रन्सवर ऑल आऊट झाली. वेस्ट इंडिजनं 95 रन्सची महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे. दरम्यान, 89 रन्सवर भारताची पहिली विकेट गेली. आणि त्यानंतर विंडीज बॉलर्सनी 7 वर 154 अशी बिक्ट अवस्था टीम इंडियाची करुन टाकली. देवेंद्र बिशू आणि कॅप्टन डॅरेन सॅमीच्या फास्ट बॉलिंगसमोर टीम इंडियाच्या बॅट्समनच काहीच चाललं नाही. टीम इंडियाच्या साऱ्या आशा या राहुल द्रविडवर. द्रविडनं आपल्या टेस्ट करिअरमधील 61 वी सेंच्युरी ठोकली. सेंच्युरीनंतर द्रविड 24 रन्सवर आऊट झाला. आणि टीम इंडियाच्या साऱ्या आशा संपुष्टात आल्या. तर सचिन तेंडुलकरच्या महासेंच्युरीची अपेक्षा क्रिकेटप्रेमींना होती. मात्र, त्यानही निराशा केली. सचिन अवघ्या 7 रन्सवर आऊट झाला. आता दिल्ली टेस्टमध्ये कमबॅक करण्यासाठी टीम इंडियाला चांगलेच कष्ट करावे लागणार आहेत.

 

दिल्ली टेस्टच्या दुसऱ्या दिवशी विकेट्सचा पाऊस पडला. भारत आणि वेस्ट इंडिज मिळून 17 बॅट्समन आऊट झाले. दुसरा दिवस गाजवला तो बॉलर्सनी. दोन्ही टीम्सच्य़ा बॅट्समनला काहीच कमाल करता आली नाही. दिवसअखेर वेस्ट इंडिजने दुस-या इनिंगमध्ये 2 विकेट्स गमावून 21 रन्स केले आहेत विंडीजकडे आता 116 रन्सची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजला 304 रन्सवर ऑलआऊट केल्यानंतर, टीम इंडियाची इनिंगही 209 रन्सवर आटोपली. राहुल द्रविडनं नेहमीप्पमाणे एकाकी झुंज दिली. त्यानं 54 रन्सची खेळी केली. भारताला झटपट आऊट केल्यानंतर दुसऱ्य़ा इनिंगमध्ये विंडीजची सुरुवातही अतिशय खराब झाली. भारताला विंडीजच्या दोन विकेट्स घेण्यात यश आलं. आता टेस्टच्या तिस-य़ा दिवशी विंडीजची इनिंग झटपट गुंडाळण्यासाठी टीम इंडियाला प्रयत्न करावे लागणार आहेत.