पाँटिंगची खेळी समाप्त, क्लार्कची झुंज

सिडनीतील दुसऱ्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड असतानाच रिकी पॉन्टिंगला ईशांत शर्माने सचिन तेंडुलकरवी झेलबाद केले. रिकी पॉन्टिंग दीड शतकी खेळी करील असे वाटत असताना रिकीचा डाव १३४ वर संपुष्टात आला.

Updated: Jan 4, 2012, 01:23 PM IST

www.24taas.com, सिडनी

 

सिडनीतील दुसऱ्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड  असतानाच रिकी पॉन्टिंगला ईशांत शर्माने सचिन तेंडुलकरवी झेलबाद केले.  रिकी पॉन्टिंग दीड शतकी खेळी करील असे वाटत असताना रिकीचा डाव १३४ वर संपुष्टात आला.

 

मात्र,  कर्णधार मायकल क्लार्क  एकाबाजुने किल्ला संभाळत आहे. तो १६६ रन्सवर खेळत आहे. त्याला हसीने साथ दिली आहे. हसी ८ रन्सवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या ३४८ रन्स झाल्या आहेत. सिडनी कसोटीवर ऑस्ट्रेलियानं आपली पकड मजबूत केली आहे. रिकी पॉन्टिंग आणि कॅप्टन मायकल क्लार्कनं टीम इंडियाच्या बॉलर्सना सळो की, पळो करुन सोडलं.

 

रिकी पॉन्टिंगनं टेस्ट करिअरमधील ४० वे शतकही पूर्ण केले. पॉन्टिंगनं तब्बल दोन वर्षानंतर शतक झळकावलं. त्यानं जानेवारी २०१० मध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकले होते. जवळपास ३३ इनिंग्जनंतर त्याला शतक पूर्ण करण्यात यश आलं. पॉन्टिंगनं आपल्या आवडत्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तब्बल सहाव्यांदा शतक ठोकलआहे. पॉन्टिंगप्रमाणे कॅप्टन मायकल क्लार्कचीही बॅट चांगलीच तळपली. क्लार्क नावाच्या प्रश्नाच उत्तर टीम इंडियाला सापडलच नाही. पहिल्य़ा सेशनप्रमाणेच दुस-या सेशनमध्येही कांगारुंनी आपलं वर्चस्व कायम राखलं.

 

कर्णधार मायकल क्लार्क आणि रिकी पॉन्टिंग यांनी झळकाविलेल्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारतावर आघाडी घेतली. यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचे दुसऱ्या कसोटी सामन्यावरही वर्चस्व निर्माण झाले आहे. पॉन्टिंगने कसोटी कारकिर्दीतील ४० वे शतक पूर्ण केले. तर क्लार्कने १८ वे शतक पूर्ण केले.

 

पॉन्टिंग ३४ डाव आणि दोन वर्षांनंतर कसोटीत शतक करता आले आहे. सिडनीत  ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगने सहावे शतक झळकावले आहे. १५० बॉल्समध्ये १०० रन्स केल्या. याआधी   मायकेलने शतक ठोकल होतं.  रिकी पाँटींग १२७ , मायकल क्लार्क १४४ रन्सवर दोघे खेळत आहे.

 

टीम इंडियाच्या आघाडीच्या बॅट्समननी पुन्हा एकदा निराशा केली असताना ऑस्ट्रेलियाने आपली पडझड सावरत  दुसऱ्या दिवशी चांगली सुरूवात केली आहे. केवळ तीन विकेट गमावून ३०७ रन्सचा टप्पा गाठला आहे.

 

पहिल्या दिवसात बॉलरसनी कमाल केली. परंतु ऑस्ट्रेलिया संघातील बॅट्समनी चांगली  कामगिरी करताना २५१ रन्स केल्या आहेत.  मायकेलने आणि रिकी पॉन्टिंग या जोडीने शतकी भागीदारी केली. ही जोडी टीम इंडियाच्या बॉलर्सची डोकेदुखी झाली आहे.

 

मेलबर्न टेस्टमध्ये याच बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळे भारताला  लाजिरवाणा पराभव सहन करावा लागला होता. विजयाची संधी असूनही बॅट्समनच्या हाराकिरीमुळे भारतानं मेलबर्न टेस्ट गमावली. आणि सिडनी टेस्टमध्येही तेच चित्र दिसून आलं. महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकरचा अपवाद वगळता एकाही बॅट्समननी पिचवर उभं राहण्याचा प्रयत्न केला नाही.

 

ऑस्ट्रेलिया 349/4 (87.0 ov)

टीम इंडिया (पहिला डाव) - 191