बहुगुणी सचिन भाग - २

मास्टर ब्लास्टरची कारकिर्द फक्त मैदानापूरतीच मर्यादित राहिली नाही तर मैदानाबाहेरही त्यानं नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केलीय..क्रिकेट पिचवर बॉलर्सची धुलाई करणारा सचिन आपल्या सामाजिक जबाबदा-या चांगल्याच ओळखून आहे. ज्या देशातील लोकांनी आपल्यावर इतक भरभरुन प्रेम केलं त्या लोकांना तेच प्रेम परत देण्यास त्यानं कधीच कसर सोडली नाही....

Updated: Apr 24, 2012, 12:04 AM IST


www.24taas.com
, मुंबई

मास्टर ब्लास्टरची कारकिर्द फक्त मैदानापूरतीच मर्यादित राहिली नाही तर मैदानाबाहेरही त्यानं नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केलीय..क्रिकेट पिचवर बॉलर्सची धुलाई करणारा सचिन आपल्या सामाजिक जबाबदा-या चांगल्याच ओळखून आहे. ज्या देशातील लोकांनी आपल्यावर इतक भरभरुन प्रेम केलं त्या लोकांना तेच प्रेम परत देण्यास त्यानं कधीच कसर सोडली नाही.... 

 

१) दानशूर सचिन

बांद्र्याच्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेला सामान्य मुलगा... त्याच्या मेहनतीनं, कष्टानं आणि जिद्दीनं असामान्य झाला. सचिनला आजपर्यंत जे काही मिळालं, त्यातलं सचिननं बरचसं समाजासाठी दिलंय आणि तेही कुठलाही गाजावाजा न करता. अपनालयसारख्या अनेक संघटनांच्या माध्यमातून सचिन समाजाची सेवा करतो.

 

त्यात देखावा किंवा प्रसिद्धी मिळवण्याचा हेतू कधीच नाही, भावना असते ती निव्वळ परोपकाराची..... सचिन त्याच्या चाहत्यांशी इतका जोडला गेलाय, की त्यानं त्याचा चाहता सुधीर कुमार चौधरीला विशेष कोट्यामधून आजीवन भारताची मॅच पाहण्यासाठी संधी दिलीय....

 

 

२) सदगुणी सचिन

बॅट्समन म्हणून जगविख्यात आणि लाखो खेळाडूंच प्रेरणा स्थान असलेला सचिन माणूस म्हणूनही आदर्शच आहे. सभोवती नेहमीच ग्लॅमरचं-मोहाच वलय असलेला सचिन कधीच नसत्या मोहाच्या आहारी गेला नाही. जगभर फिरलेला सचिन आपल्या सर्वच जबाबदा-या चोख ओळखून आहे.

 

आपल्यावर क्षणो-क्षणी लाखो नजरा असतात त्यात लहानांपासून ते वयोवृद्द सर्वच आले. याची त्याला खास जाणिव आहे. आणि म्हणूनच त्यानं आपली वागणूक आदर्शच ठेवलीय. आपल्या मुल्यांशी सचिननं कधीच तडजोड केली नाही.

 

वाटेल तेवढी किंमत मिळत असलानाही त्यानं एका दारुच्या जाहिरातीस साफ नकार दिला.. तर समाजप्रबोधनाच्या अनेक जाहिराती त्यानं कसलाच मोबदला न घेताही केल्यात... आपल्यापेक्षा लहान असो किंवा मोठा सचिन प्रत्येकाशीच आदरानं नम्रतेनं वागतो.

 

३) हसतमुख सचिन

5 फूट 5 इंचच्या देहावर एक गोल नेहमीच हसरा चेहरा..हे सचिनचं एक खास वैशिष्ट्य... 39 वर्षांच्या प्रवासात सचिन समोर कितीतरी संकट आली आणि गेली पण त्याचा सचिनच्या त्या ऐव्हरग्रीन स्माईलवर कधीच परिणाम झाला नाही. तो नेहमीच हसत राहिला आणि त्यानं दुस-यांना पण हसायला आनंद घ्यायला शिकवलं..

 

हसता हसता कोणत्याही आव्हानाला सहज समोरं जाता येतं हे सचिनपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं कोण दाखवू शकेल? तो कधीच कोणावर चिडला नाही किंवा ओरडलाही नाही...टीममधील सर्वात लहान बॅट्समन ते कॅप्टन आणि नंतर टीममधील सर्वात अनुभवी प्लेअर या संपूर्ण प्रवासात त्याच्या चेह-यावर त्याच चिरपरिचित हास्य कायम राहिलय..आणि तो असाच हसताना दिसावा अशीच सर्वांचीच अपेक्षा आहे...

 

.

Tags: