भारताने 'बोनस गुणासह जिंकून दाखवलं'

आज भारताची शेवटची वनडे श्रीलंकेसोबत सुरू आहे. होबार्ट वन-डेत भारताने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. लंकेविरूद्ध महत्त्वाच्या मॅचकरता टीम इंडियामध्ये झहिर खान परतला असून, इरफान पठाणला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली आहे.

Updated: Feb 28, 2012, 04:56 PM IST

www.24taas.com, होबार्ट

 

भारताने श्रीलंकेविरूद्धचा सामना बोनस पॉईंटसह मॅच जिंकून सिरीजमध्ये फायनलाला जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. धावांचा पाठलाग करताना फक्त ३६.४ ओव्हर मध्ये सामना जिंकत भारताने नवा इतिहास रचला. सगळ्यात जलद केलेला धावांचा हा यशस्वी पाठलाग आहे. भारताने ७ विकेट राखून  लंकेला लोळवले. विराट कोहलीची शानदार आणि मॅरेथॉन खेळीने भारताला हा विजय मिळवून दिला. त्याने त्याचे शतक पूर्ण केलंचं मात्र त्यासोबत टीम इंडियाला मॅच जिंकून देण्यातही सिंहाचा वाटा उचलला.  विराट कोहलीने तुफान फटकेबाजी करत फक्त ८६ बॉलमध्ये १३२ रन्स केलेत, त्यात तब्बल १६ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता.

 

लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

कोहलीने केलेली फटकेबाजीत दाहकता होती.  त्याने श्रीलंकेच्या प्रत्येक बॉलरची अक्षरश: निदर्यीपणे कत्तलच केली. 'हा विजय नक्कीच विराट ठरला असला तरी त्याला गौतमची 'गंभीर' साथ मिळाल्यानेच शक्य झाला आहे. तसंच कोहली सोबत रैनानेही 'वाहत्या गंगेत हात धुवून घेतले'. गेल्या काही मॅचमध्ये रैनाही चमकदार कामगिरी करू शकला नव्हता. मात्र आज त्याला वर बढती देऊन धोनीने पुन्हा एकदा त्यावर दाखवलेला विश्वास आज त्याने सार्थ ठरवला. त्याने २४ बॉलमध्ये ४० रनची खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला.

 

  होबार्ट वन-डे अत्यंत रोमांचक वळणावर आली आहे. भारताला ४० ओव्हरच्या आत सामना संपवायचा आहे. हे उदिष्ट समोर ठेऊन  भारताने पूर्ण सिरीजमध्ये आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. पण, मात्र आज भारतीय बॅट्समनने आपला खेळ उंचावत मॅच जिंकण्याच्या आशा निर्माण केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरूद्ध टेस्टमध्ये एकमेव शतक झळकावणाऱ्या कोहलीने आज पुन्हा एकदा शतक करून दाखवलं आहे. त्याने फक्त ७५ बॉलमध्ये १०० रन केले. त्यानंतरही तो थांबला नाही, त्याने आपली तुफान फटकेबाजी चालूच ठेवली.

 

सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांनी भारताचा डाव सावरला. काही काळातच या दोघांनीही अर्धशतकं झळकावली. त्यामुळे भारताने २५ ओव्हरमध्ये १९० रनपर्यंत मजल मारली होती. त्याच वेळी  गंभीरने ४७ बॉलमध्ये आपलं अर्धशतक झळकावलं तर कोहलीने गंभीरला साथ देत आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं.

 

भारताच्या डावात २५ ओव्हर शिल्लक असताना १३१ रनची गरज होती. दरम्यान, त्यापूर्वी  सेहवाग पाठोपाठ सचिनही तंबूत परतला. त्यामुळे भारताच्या अडचणीत आता भर पडली होती.  सचिन फॉर्मात आला आहे असं वाटताना मलिंगाच्या यॉर्करवर सचिन पायचित झाला.

 

डावाला  भारताने श्रीलंकेविरूद्ध धमाकेदार सुरवात केली. सेहवाग आणि सचिन यांनी तडाकेबाज फटकेबाजीला सुरवात केली. सचिनने देखील अप्रतिम फटके मारले, तर सेहवागने त्यांच्या शैलीत फटकेबाजीला सुरवात केली, फक्त ६ ओव्हरमध्ये या दोघांनी स्कोर ५० रनवर नेला होता.

 

सेहवागने फक्त १६ बॉलमध्ये ३० रन केले, ज्यात ५ फोर आणि १ सिक्सचा समावेश आहे. मात्र, एक फटका मारताना त्याचा अंदाज चुकला आणि महारूफला आपली विकेट देऊन बसला. भारताला जिंकण्यासाठी ४२ ओव्हरमध्ये २५६ रनची गरज आहे.

 

दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करताना  श्रीलंकेने भारताला अक्षरश: झोडपून काढलं आहे. भारतीय बॉलरांनी श्रीलंकेला मनमुराद फटकेबाजी करण्याची आयाती संधीच दिली. त्यामुळे श्रीलंकेने भारतासमोर धावांचा डोंगर उभारत ३२१ रनचं आव्हान ठेवलं होतं.  श्रीलंकेचा खरा हिरो ठरला तो म्हणजे तिलकरत्ने दिलशान. त्याने दिडशतकी खेळी करून भारताला अक्षरश: नामोहरम केले. तसेच भारतीय बॉलरांनी नांगी टाकली. श्रीलंकेच्या फक्त ४ विकेट घेण्यात त्यांना यश आले.

 

तर दिलशान शेवटपर्यंत बॅटींग करत नॉटआऊट राहिला. त्याने १६५ बॉलमध्ये १६० रनची मॅरेथॉन खेळी केली. पण त्याला आऊट करण्यात भारतीय बॉलर अपयशी ठरले. श्रीलंकेला दिलशान आणि संगकारा यांच्या शतकांच्या जोराव