भारत पाक वनडेला सुरुवात

एशिया मालिकेत भारत पाकिस्तान वनडे सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा करण्याचा निर्णय घेतला. भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. टीम इंडियात रविंद्र जाडेजा ऐवजी युसूफ पठाणला संधी देण्यात आली आहे.

Updated: Mar 19, 2012, 07:12 AM IST

 www.24taas.com, मीरपूर

 

एशिया मालिकेत भारत पाकिस्तान वनडे सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा करण्याचा निर्णय घेतला. भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. टीम इंडियात रविंद्र जाडेजा ऐवजी युसूफ पठाणला संधी देण्यात आली आहे.

 

भारत-आणि पाकिस्तनची मॅच म्हणजे क्रिकेटचं युद्धचं. शेर-ए-बांग्ला स्टेडियवर रविवारी होणा-या मॅचपूर्वी झालेल्या दोन्ही लढतीत टीम इंडियानचं सरशी साधली होती. वर्ल्ड कपमध्ये मोहलीत आणि  २०१० एशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला पराभूत केल आहे. त्यामुळे सलग तिस-यांदा पाकिस्तानला पराभूत कऱण्याच्या इराद्यानेच धोनी ब्रिगेड मैदानात उतरणार आहे.

 

हा सामना भारता जिंकावा लागणार आहे. तरच फायनलचं तिकिट पक्के होणार आहे. शेर-ए-बांग्लावर भारत-पाकिस्तान पारंपारिक प्रतीस्पर्धी पुन्हा एकदा आमने-सामने ठाकणार.तब्बल एक वर्षानंतर दोन्ही कट्टर वैरी विजयासाठी भिडणार..या लढतीपूर्वीच्या दोन्ही लढतीत टीम इंडियाचं सरस ठरली होती..वर्ल्ड कपमध्ये मोहली आणि २०१० एशियाकपध्ये या लढती झाल्या होत्या. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारत- पाकिस्तानमध्ये  हाय व्होल्टाज मॅच झाली होती. भारतानं मोहालीचे युद्ध रणवीर सचिनच्या ८५ रन्सच्या जोरावर भारतानं जिंकलं होतं.

 

मैदानावरही दोन्ही टीम्सच्या प्लेअर्समध्ये चांगली खडाजंगीही झाली. मात्र भारतानं या रोमहर्षक मॅचमध्ये १ बॉल आणि ३  विकेट्सनी विजय मिळवत सरशी साधली होती..या दोन्ही विजयानंतर टीम इंडिया शेर ए बांग्लामध्ये पाकिस्तानविरुद्ध सलग तिसरा विजय मिळवून हॅटट्रिक पूर्ण कऱण्यासाठी आसुलेली आहे. दोन्ही टीम्सच्या चाहत्यांनाही ऐकमेकांविरुद्ध कोणत्याही परिस्थिती फक्त आणि  फक्त विजयच हवा असतो. त्यामुळे दोन्ही टीम्सची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. आता हे महायुद्ध कोण जिंकणार याकडेच क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे.