मुंबईचे बंगळुरूसमोर १४२ धावांचे आव्हान

आयपीएलच्या अंतीम चार मध्ये स्थान मिळविण्यासाठी अति महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बंगळुरू रॉयल चँलेंजर्ससमोर नांगी टाकली असून १० षटकात ३ बाद ४८ धावा केल्या आहेत. फ्रँकलिन, रोहीत शर्मा आणि सचिन तेंडुलकर सारख्या महत्वाच्या विकेट बंगळुरूने घेऊन मुंबईला धक्क्यावर धक्के दिले आहेत.

Updated: May 9, 2012, 09:53 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

आयपीएलच्या अंतीम चार मध्ये स्थान मिळविण्यासाठी अति महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बंगळुरू रॉयल चँलेंजर्ससमोर २० षटकांत १४२ धावांचं आव्हान ठेवलं आहे. सुरूवातीला मुंबई इंडियन्सची पडझड झाली. मात्र, दिनेश कार्तिक  (४४) , हरभजन सिंग (२०) आणि पोलार्ड (२२) यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे १४१ धावांचा पल्ला गाठला.

बंगळुरूकडून  मुरलीधरन, विनयकुमार आणि पटेल यांनी  प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

 

आजच्या सामन्यात मुंबईने अतिशय खराब सुरुवात केली. दुस-याच षटकात जेम्स फ्रॅकलिन (१) आणि रोहित शर्मा (०) यांना विनयकुमार यांनी माघारी पाठवले. फ्रॅकलिनला त्याने झहीर खानकडे झेल देण्यास भाग पा़डले. तर रोहित शर्माला त्याने पायचित पकडले. सचिन तेंडुलकर काही काळ टिकला परंतु केवळ २४ धावा करून तोही तंबूत परतला  बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Tags: