www.24taas.com, बोस्टन
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक खूषखबर आहे. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आनंद होईल की युवराज सिंग याचा ट्युमर आता जवळपास नष्ट झाला आहे. ही माहिती युवीने स्वतः ट्विटरवर दिली आहे. युवराजवर सध्या अमेरिकेतील बोस्टनमध्ये इलाज सुरू आहेत.
युवराज संगने ट्विट केले आहे, “केमोथेरपीच्या पहिल्या सेशननंतर माझा ट्युमर जवळपास नष्ट झाला आहे. आता केमोथेरपीचं दुसरी सायकल सुरू झाली आहे.” युवराज सिंगच्या डॉक्टरांनी स्कॅन रिपोर्ट पाहिल्यावर युमर जवळपास नष्ट झाल्याचं सांगितलं आहे. हे ऐकून फक्त युवराजनेच नव्हे तर युवराजच्या लाखो फॅन्सनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
युवराज गेल्या नोव्हेंबरपासून ते अद्याप कुठलीही टुर्नामेंट खेळू शकला नाही. युवराज पुन्हा मैदानात उतरून कधी नेहमीसारखे चौकार-षटकार लगावणार याची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहात आहेत. युवीच्या डॉक्टरांच्या मते मे महिन्यापर्यंत युवराज एकदम फिट होऊन नेहमीच्याच आक्रमकतेने मैदानात उतरू शकेल.