युवराज सिंगवरील उपचार शेवटच्या टप्प्यात

अमेरिकेत उपचार घेत असलेल्या युवराज सिंग याचे उपचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचले असून पुढील चार दिवसांत युवराजची केमोथेरपी संपणार आहे. युवराजने ट्विटरवर लिहीलं आहे, “केमोथेरपी आता शेवटच्या टप्प्यात आहे. हे संपण्याची मी वाट पाहातोय. देवा, मला यातून मोकळं कर.”

Updated: Mar 14, 2012, 11:45 AM IST

www.24taas.com, बोस्टन 

 

अमेरिकेत उपचार घेत असलेल्या युवराज सिंग याचे उपचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचले असून पुढील चार दिवसांत युवराजची केमोथेरपी संपणार आहे. युवराजने ट्विटरवर लिहीलं आहे, “केमोथेरपी आता शेवटच्या टप्प्यात आहे. हे संपण्याची मी वाट पाहातोय. देवा, मला यातून मोकळं कर.” गेल्याच महिन्यात युवराजने ट्विट केलं होतं की, त्यांचा फुप्फुसांचा ट्युमर नष्ट झाला आहे.

 

गेल्या महिन्यापासून बोस्टनमध्ये उपचार घेत असलेला युवराज मे महिन्यात पुन्हा खेळण्यासाठी मैदानात उतरू शकतो. उपचारांदरम्यान युवराजचे केसही गेले होते. युवराजवरील उपचार मार्चच्या शेवट आठवड्यापर्यंत चालणार आहे. यानंतर एप्रिलमध्ये रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवण्यात येईल.

 

वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाची भुमिका बजावणारा युवराज गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत एकही टूर्नामेंट खेळू शकलेला नाही. युवराज पुन्हा मैदानावर खेळण्यासाठी केव्हा येईल यांचीच त्याचे चाहते वाट पाहत आहेत. युवराजने ३७ टेस्टमध्ये ३४.८० च्या स्ट्राईक रेटने १७७५ रन काढले आहेत. तर २७४ वनडे मध्ये ३७.६२ च्या स्ट्राईक रेटने ८०५१ रन काढले आहेत. तर २३ टी-२० मॅचमध्ये त्याच्या नावावर ५६७ रन केले आहेत.