विराटने सावरलं, रोहितने आवरलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टेस्ट सीरिजमध्ये विराट कोहलीचा फॉर्म निर्णायक ठरणार आहे. विराटनं दुसऱ्या प्रॅक्टिस मॅचमध्ये आपल्या बॅट जादू दाखवली. त्यानं १३२ रन्सची झुंजार इनिंग खेळली.

Updated: Dec 20, 2011, 12:06 PM IST

झी २४ तास वेब टीम, कॅनबेरा

 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टेस्ट सीरिजमध्ये विराट कोहलीचा फॉर्म निर्णायक ठरणार आहे. विराटनं दुसऱ्या प्रॅक्टिस मॅचमध्ये आपल्या बॅट जादू दाखवली. त्यानं १३२ रन्सची झुंजार इनिंग खेळली. त्याच्या याच जबरदस्त फॉर्ममुळे तो कांगारुंसाठी चांगलीच डोकेदुखी ठरणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया चेअरमन इलेव्हनविरुद्धच्या प्रॅक्टिस मॅचमध्ये भारताच्या आघाडीच्या बॅट्समननी निराशा केली. टॉप ऑर्डर फ्लॉप ठरल्यानंतर विराट कोहलीनं  रोहित शर्माच्या साथीनं भारताची इनिंग सावरली. त्यानं जबाबदारीनं बॅटिंग करत टीम इंडियाची आणखी पडझड होऊ दिली. मनूका ओव्हलच्या तेज तर्रार ट्रॅकवर त्यानं फास्ट बॉलर्सचा यशस्वीपणे सामना केला.

 

कांगारु बॉलर्सना वरचढ होण्याची त्यानं कोणतीही संधी दिली नाही. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडला या मॅचमध्ये विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे मिडल ऑर्डरची जबाबदारी व्हीव्हीएस लक्ष्मण, विराट कोहली आणि रोहित शर्मावरवर होती. लक्ष्मण १५ रन्सवर आऊट झाल्यावर विराट-रोहित जोडीनं आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. विराट वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात झालेल्या टेस्ट आणि वन-डे सीरिजमध्ये तुफान फॉर्ममध्ये होता. त्यानं आपला फॉर्म ऑस्ट्रेलियातही कायम राखला आहे. पहिल्या प्रॅक्टिस मॅचमध्ये एक रनवर आऊट झाल्यानंतर त्यानं दुसऱ्या मॅचमध्ये निराशा केली नाही. त्याच्या सेंच्युरीमुळेच भारताला २६९ रन्सपर्यंत मजल मारता आली.

 

विराटनं १७२ बॉल्समध्ये १३२ रन्सची शानदार इनिंग खेळली. यामध्ये १८ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. ७७.१९ च्या स्ट्राईक रेटनं त्यानं हे रन्स केले.  कोहलीची ही खेळी भारताच्या इनिंगच खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य ठरली.  कोहलीच्या बॅटमधून रन्सची बरसात होते आहे. त्याच्यामध्ये आणि रोहित शर्मामध्ये मिडल ऑर्डरमध्ये टीम इंडियात स्थान मिळविण्यासाठी रेस सुरु आहे.