www.24taas.com, मुंबई
'सचिनला मिळालेली खासदारकी हा त्यांचा मान आहे', 'आणि त्याने तो घ्यावाच'. असं रोखठोक मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेत मांडलं. सचिन तेंडुलकरला खासदारकी देण्याचा प्रश्नावरून बऱ्याच मोठ्या प्रमाणात राजकिय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. मात्र राज ठाकरे यांनी वेगळं असं त्याचं मत माडलं आहे. 'सचिन हा कोणत्याही पक्षांचा नाही',
'तो खेळाडू म्हणून महान आहे, आणि त्यामुळे त्याचा हा सन्मान करण्यात आला आहे'. 'त्याचा त्याने स्विकार करायचा की नाही हा सर्वस्वी वैयक्तिक प्रश्न आहे', त्यामुळे आपण त्याला सल्ले देणारे कोण आहोत'. असा खडा सवालही राज ठाकरे यांनी विचारला.
तर खासदार झाल्यास सचिनने काँग्रेसमध्ये यावे ह्या संजय निरूपम यांच्या वक्तव्यावर राज ठाकरेंनी चांगलेच उत्तर दिले. 'कोण म्हणतो कि सचिनने काँग्रेसमध्ये जाणार', 'ज्यांची रस्त्यावर ठेले लावण्याची लायकी नाही ते खासदार झाले आहेत', 'खासदारांनी खासदार या पदाला इतकं खराब केलं आहे', 'त्यामुळे सचिन खासदार होऊ नये असं आपल्या वाटतं','सचिनला हा मिळालेला मान आहे त्याने तो घ्यावा',
'सचिनने या सगळ्या लोकांपासून, गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे', 'पण दिलेला मान घ्यावा', याआधी लतादीदी पण खासदार होत्या. 'पण त्या कोणत्याही पक्षाचे नव्हत्या', 'पद्मश्री, पद्मविभूषण हे पुरस्कार देखील दिले जातात तर ते मान असतात तसाच हा देखील मान आहे', असं म्हणतं राज ठाकरे यांनी सचिन तेंडुलकरच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
कोण कोणता तो फडतूस सैफ अली खान, त्यालादेखील पद्मश्री देतात, काय केलयं त्याने एवढं मोठं, असं म्हणत राज ठाकरे यांनी सैफ अली खानवर देखील टीका केली. खासदारकी स्विकारणं ही सचिनची वैयक्तिक बाब आहे, सचिन ही खूप मोठी व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांनी काय करावं हे त्यांना चागंलचं माहिती आहे, सचिनच्या मनात काय आहे, हे सचिनने स्पष्ट केलंलं नाही, त्यामुळे आपण काही बोलणं अयोग्य आहे', 'सचिन संसदेत गेला आता काही प्रॉब्लेम आहे का?, 'सचिन इतका मोठा खेळाडू नसल्याने त्याला खासदारकी देण्यात आली आहे'.
दुष्काळावर देखील राज ठाकरे यांचं वक्तव्य
तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर सरकार चांगलेच तोंडसुख घेतले. 'पश्चिम महाराष्ट्रात टॅंकरने पाणी पुरवावं लागतं तर इतर प्रदेशाची काय अवस्था असणार?, 'प. महाराष्ट्रात काँग्रेस आणि NCP ची सत्ता आहे, काय केलं एवढं वर्ष त्यांनी?, 'पाण्याच्या प्रश्नावर करोडो रूपये जातात कुठे?, असा प्रश्न त्यांनी राज्यकर्त्यांना विचारला. 'मलाही अनेकांनी सांगितलं दुष्काळी भागाचा दौरा करावा',
'पण दौरा करून काय करणार, 'मी काही त्यांना पाणी देऊ शकत नाही, 'माझ्या हातात सत्ता नाही'. 'त्यामुळे मी काही करू शकत नाही'. मला दुष्काळग्रस्तांबाबत नक्कीच सहानुभूती आहे. असं म्हणतं राज ठाकरे यांनी सरकारला पुन्हा एकदा अडचणीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रश्न - राज ठाकरे तुम्हांला खासदारकी ऑफर केली तर....
उत्तर - मला कोण खासदारकी देणार..... (राज)