सचिनला कडकडून मिठी मारेन - राज ठाकरे

सचिनच्या महासेंच्युरीनंतर राजकीय नेत्यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनचे चाहते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्याचं मनापासून कौतुक केलं आहे.

Updated: Mar 16, 2012, 08:14 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

सचिनच्या महासेंच्युरीनंतर राजकीय नेत्यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनचे चाहते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्याचं मनापासून कौतुक केलं आहे. सचिनने केलेल्या महाशतकाचे कौतुक तर केलेच मात्र त्याचसोबत कौतुक करताना त्यांनी सांगितले की, सचिन मुंबईत आल्यानंतर प्रथम त्याला कडकडून मिठी मारेन. सचिन आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्री ही साऱ्यांनाच परिचीत आहे.. त्यामुळे सचिनने सर केलेलं हे यश नक्कीच उल्लेखनीय आहे.

 

त्यामुळे सचिन आणि राज ठाकरे यांचं अतूट नातं आहे. तसचं राज यांनी सांगितलं की, सचिनने त्यांच्या आजच्या खेळीने टीकाकारांची तोंड बंद केली आहेत. असं देखील राज ठाकरे यांनी सांगितलं. सचिन तेंडुलकरने आजवर अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर केले मात्र महाशतकाचा विश्वविक्रम त्याला गेले वर्षभर हुलकावणी देत होता. गेल्या वर्षी खेळलेल्या वर्ल्डकपच्या सामन्यात त्याने द. आफ्रिकेविरूद्ध शतक केलं होतं ते त्याचं ९९वं शतक होतं. १२ मार्च २०११ला सचिनने शेवटची सेंच्युरी केली होती.

 

सचिनने आज अगदी सथंपणे खेळाला सुरवात केली. गंभीर झटपट आऊट झाल्याने सचिनने आपल्या फटक्याना आवर घालत आपला खेळ हळूहळू पुढे नेला, त्याने गेल्या २० वर्षाचा अनुभव पणाला लावीत आपली शंभरावी सेंच्युरी पूर्ण केली. त्याने १३८ बॉलमध्ये १०० रन केले. पण त्यानंतरही त्याने आपला खेळ पुढे चालूच ठेवला. तो ११४ रन करून परतला, त्यात १२ फोर आणि १ सिक्सचा समावेश होता….  १०० शतकं करून त्याने त्याच्या करोडो चाहत्यांची मनोकामना पूर्ण केली.