www.24taas.com ,नवी दिल्ली
विक्रमादित्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १०० शतके झळकावल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या खेळाची दखल घेत केंद्र सरकारने राज्यसभेवर घेण्याचे ठरविले आणि त्याची निवडही केली. मात्र, सचिनची राज्यसभेवरील नियुक्ती रद्द करण्याची मागणी माजी आमदार रामगोपाल सिसोदिया यांनी केली होती. परंतु न्यायालयाने नियुक्तीस नकार दिला आहे.
दिल्लीचे माजी आमदार सिसोदिया यांनी दिल्ली न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचे दार ठोठावण्यास लागणार आहे.
घटनेच्या कलम ८0 अन्वये केवळ कला, साहित्य आणि विज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या नामवंत व्यक्तींचीच राज्यसभेवर नियुक्ती केली जाऊ शकते. असे असताना सचिनची राज्यसभेवर नियुक्ती होऊ शकत नाही, असे सांगत सिसोदिया यांनी सचिनच्या नियुक्तीला आव्हान दिले होते.