सोनेरी क्षणांना सोनेरी नजराणा

सचिन तेंडूलकरने वेस्ट इंडिज विरुध्दच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात जर हे विक्रमी शतक ठोकलं तर त्याच्यावर १०० सोन्याची नाण्यांचा वर्षाव करण्याचं मुंबई क्रिकेट असोशिएशनने ठरवलं आहे.

Updated: Nov 19, 2011, 10:21 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

सर्वांनाच प्रतिक्षा लागून राहिली आहे ती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या १०० व्या कसोटी शतकाची आणि मुंबई क्रिकेट असोशिएशनही विक्रमादित्याच्या विक्रमाचा सन्मान करण्यासाठी सज्ज झालं आहे. सचिन तेंडूलकरने वेस्ट इंडिज विरुध्दच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात जर हे विक्रमी शतक ठोकलं तर त्याच्यावर १०० सोन्याची नाण्यांचा वर्षाव करण्याचं मुंबई क्रिकेट असोशिएशनने ठरवलं आहे. मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष विलासराव देशमुखांनी तेंडूलकरने जर घरच्या मैदानावर १०० वे शतक साजरं केलं तर त्याला १०० सोन्याची नाणी देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेतला हे.

 

क्रिकेट असोशिएशन ऑफ बंगाने तेंडूलकरने एडन गार्डनवर हा अभूतपूर्व विक्रम नोंदवला असता तर १०० सोन्याची नाणी देण्याचे वचन दिलं होतं. पण सचिनला कोलकात्यात हा मैलाचा टप्पा गाठता आला नाही आणि त्याला आता आपल्या घरच्या मैदानावर हा विक्रम साजरा करण्याची सूवर्णसंधी चालून आली आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय मधलं या आधीचे शतक साऊथ आफ्रिके विरुध्द वर्ल्डकपमध्ये नागपूर इथे फटकावलं होतं.