‘ट्‌विटर’वर सचिनचे अभिनंदन

क्रिकेटचा बादशहा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला तब्बल एक वर्ष शतकाची हुलाकावणी. केवळ एका शतकाने होणार होते महाशतक...जगभरातील सर्व क्रिकेट चाहत्यांनी ज्या शतकाची प्रतिक्षा केली होती. अखेर ते सचिनचे महाशतक मिरपूरमधील शेर-ए-बांगला मैदानावर साजरे झाले आणि वर्षभर लांबलेली महाशतकाची प्रतिक्षा संपली. सचिनवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. सोशल साईटवर तर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यापैकी ‘ट्‌विट’वरील काही निवडक संदेश..

Updated: Mar 16, 2012, 06:26 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

क्रिकेटचा बादशहा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला तब्बल एक वर्ष शतकाची हुलाकावणी. केवळ एका शतकाने होणार होते महाशतक...जगभरातील सर्व क्रिकेट चाहत्यांनी ज्या शतकाची प्रतिक्षा केली होती. अखेर ते सचिनचे महाशतक मिरपूरमधील शेर-ए-बांगला मैदानावर साजरे झाले आणि वर्षभर लांबलेली महाशतकाची प्रतिक्षा संपली. सचिनवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. सोशल साईटवर तर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यापैकी ‘ट्‌विट’वरील काही निवडक संदेश..........

 

 

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकन वॉन

सचिनने केलेली ही असामान्य कामगिरी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणावा लागेल. सचिनने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले असून, शतकांचे शतक पूर्ण करून तो अद्वितीय फलंदाज ठरला आहे.

 

 

वाऱ्याशी स्पर्धा करणारा उसेन बोल्ट

जगातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून प्रसिद्ध असलेल्या उसेन बोल्टनेही त्याचा खेळ पाहण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते. तर "वेगाचा बादशहा' म्हणून ओळखला जाणारा मायकल शुमाकरही त्याच्या खेळाचा चाहता आहे.

 

 

समालोचक हर्षा भोगले

yes!! well done superstar! what joy following your career. man and cricketer, what an ornament!'
बिग बी अमिताभ बच्चन

 

God's special creation .. Sachin Tendulkar !! 'India breathes normally ..!! Sachin completes an incredible feat !! A hundred 100's .. Never done before, perhaps never after !!!'

 

 

उद्योगपती आनंद महिंद्र

'Sachin proved the Budget that mattered was his budgeted score.. Bravo, to an authentic legend..'
अभिनेता अभिषेक बच्चन

या क्षणाचे साक्षीदार केल्याबद्दल सचिनने आभार आणि अभिनंदन.

 

 

अभिनेता अक्षय कुमार

सचिनला सलाम. सचिनने जागतिक इतिहास केला.

 

 

अभिनेत्री बिपाशा बसू

Saluting The Great Tendulkar fr his 100th 100!We stopped our shoot to see it happen!Jubilant n Ecstatic:)

 

 

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

Master blaster... Salute!

 

 

उद्योगपती सिद्धार्थ मल्ल्या

Congratulations@sachin_rt for his 100th 100!!!! Amazing player, amazing human...what an achievement...

 

 

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही टि्वटरवरुन सचिनचे  खास अभिनंदन केले. याशिवाय लेखिका शोभा डे, वेगवान गोलंदाज आर. पी. सिंग, प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर,   खासदार शशी थरुर, गुजराचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, ओमर अब्दुला, आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हारुन लार्गट, आपीएलचे प्रणेते ललित मोदी, चेतन भगत यांनी सचिनचे अभिनंदन केले आहे.