राम कदम-क्षितीज ठाकूर यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी

आमदार राम कदम आणि आमदार क्षितीज ठाकूर यांना आज पुन्हा मुंबईतल्या किला कोर्टात हजर करण्यात आलं. दोन्ही आमदारांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Updated: Mar 22, 2013, 04:29 PM IST

www.24taas.com, मुंबई
आमदार राम कदम आणि आमदार क्षितीज ठाकूर यांना आज पुन्हा मुंबईतल्या किला कोर्टात हजर करण्यात आलं. दोन्ही आमदारांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 5 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कदम आणि ठाकूर यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे.
आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना काल एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. वाहतूक शाखेचे पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना विधानभवनात मारहाण केल्याप्रकरणी आमदारांविरुद्ध तक्रार आहे.
मुंबईतील वाहतूक शाखेचे पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी अटक झालेले आमदार राम कदम यांच्यासमोरील अडचणींत आणखी वाढ होण्याची चिन्ह आहेत. घाटकोपर परिसरातील पंतनगर येथे शिधा पुरवठा अधिका-याला झालेल्या मारहाण प्रकरण त्यांच्या अंगाशी येणार असं चित्र आहे.
पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी राम कदम यांच्या कस्टडीची मागणी केलीये. थोड्याच वेळात किला कोर्टात कदम यांना हजर केलं जाणार आहे. यावेळी पंतनगर पोलिसांच्या मागणीवर कोर्ट निकाल देऊ शकतं...