निलंबित आमदारांची अटक आज टळली

क्राइम ब्रांचची टीम विधान भवन परिसरात हजर झाली असून निलंबित आमदारांना अटक करण्यात येणार होती. मात्र आज निलंबित आमदारांची अटक टळली असून राम कदम आणि क्षितिज ठाकूर उद्या स्वतःहून अटक होणार आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 21, 2013, 09:20 AM IST

www.24taas.com, मुंबई
क्राइम ब्रांचची टीम विधान भवन परिसरात हजर झाली असून निलंबित आमदारांना अटक करण्यात येणार होती. मात्र आज निलंबित आमदारांची अटक टळली असून राम कदम आणि क्षितिज ठाकूर उद्या स्वतःहून अटक होणार आहेत.
ज्यावेळी क्राइम ब्रँचची टीम भधानभवनात शिरली, तेव्हा त्यांच्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांकडे प्रवेशासाठी असणारा पास नसल्याचं लक्षात आलंय या गोष्टीवर विधान भवनातील आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला. या आक्षेपाची विधानसभा अध्यक्षांनी दखल घेतली. आयुक्तांशी बोलणी करण्यात आली.

विधान भवनाच्या मर्यादेलाच न शोभणारं हे कृत्य घडल्याचं समोर आलं आणि एकच खळबळ उडाली.. यानंतर संतप्त झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी थेट विधानभवन गाठलं. पोलीस महासंचालक संजीव दयाळ, मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह आणि हिमांशू रॉय यांनी या मारहाणप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी याबाबत खेद व्यक्त करत, चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले.