हैदराबाद स्फोट : शांतता राखा - पंतप्रधान

हैदराबाद येथे येऊन दिलसुखनगर येथे दुहेरी बॉंम्बस्फोट झालेल्या घटनास्थळाला भेट देत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज जखमींची विचारपूस केली. दरम्यान, सोनिया गांधी हैदराबाबत गेल्याच नाहीत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 24, 2013, 03:50 PM IST

www.24taas.com, हैदराबाद
हैदराबाद येथे येऊन दिलसुखनगर येथे दुहेरी बॉंम्बस्फोट झालेल्या घटनास्थळाला भेट देत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज जखमींची विचारपूस केली. दरम्यान, सोनिया गांधी हैदराबाबत गेल्याच नाहीत.
पंतप्रधान नवी दिल्लीहून विशेष विमानाने आज सकाळी हैदराबादला आले. घटनास्थळाला भेट देण्यासोबतच पंतप्रधानांनी या बॉंम्बस्फोटातील जखमी नागरिकांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यांच्यासोबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी हे सुद्धा होते.
या स्फोटांप्रकरणी एकही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. आंध्र पोलिसांनी स्फोटांप्रकरणी लवकरच धागेदोरे हाती लागण्याची शक्ययता वर्तविली आहे. स्फोटामागे इंडियन मुजाहिदीन दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे.

दिलसुखनगर येथे गुरुवारी सायंकाळी झालेल्या दुहेरी स्फोटांमध्ये १६ जण ठार, तर ११७ जण जखमी झाले होते. स्फोटानंतर पंतप्रधानांनी स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना दोन लाख आणि जखमींच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज घटनास्थळाला भेट दिली.