घ्या पायताण आणि हाणा मला- अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण करताना त्यांचा अस्सल ग्रामीण बाज समोर येतो. सातारा दौ-यावेळी एकाठिकाणी भाषणात गावाचं नाव उच्चारताना अजितदादांची चांगलीच तारांबळ उडाली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 8, 2013, 08:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सातारा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण करताना त्यांचा अस्सल ग्रामीण बाज समोर येतो. सातारा दौ-यावेळी एकाठिकाणी भाषणात गावाचं नाव उच्चारताना अजितदादांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्या गावाचे योग्य नाव सांगितल्यावर अजितदादा म्हणाले, आता घ्या पायताण आणि हाणा मला..... तुम्ही जे म्हताहेत ते.... असे म्हटल्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला....
अजित पवार एका कार्यक्रमानिमित्त साताऱ्यातील एका गावात गेले होते. त्यावेळी विकास कामांची माहिती देत असताना त्यांनी कुरोशी ते कोठरोशी असा उल्लेख केला. पण आपण काही तरी चुकलो आहे, असे वाटल्यावर त्यांनी पुन्हा त्या गावाचं नाव घेतलं. पण या वेळी त्यांची फार तारांबळ उडाली. मग व्यासपीठावर उपस्थित असलेल्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी दादांना करेक्ट करण्याचा प्रयत्न केला. मग दादांचा आणखी गोंधळ उडाला.
दादांनी पुन्हा व्यवस्थित वाचण्याचा प्रयत्न केला. पण उत्साही कार्यकर्ते त्यांना पुन्हा करेक्ट करून कुरोशी गावाचं नाव सांगितलं आणि कार्यकर्ते मागू म्हणतं होतं बरोबर हाय बरोबर हाय.... तेवढ्यात अजितदादांमधील ग्रामीण गडी जागा झाला आणि ते म्हणाले, आता घ्या पायताण आणि हाणा मला..... तुम्ही जे म्हताहेत ते.... असे म्हणत वेळ मारून नेली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.