www.24taas.com, पुणे
अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या निषेधार्थ बारामतीकरांनी बंद पाळलाय. दुपारपर्यंत शहरातले सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. सकाळपासून बारामतीच्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट आहे. तर राजीनाम्याचे पडसाद राज्यभर उमट आहेत.
सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आलेत. बंदसाठी बारामती शहरातले व्यापारी आघाडीवर आहेत. शहरात उत्स्फूर्त बंद ठेवण्यात आलाय. औरंगाबाद जिल्हा परिषदेत राजीनाम्यांचे सत्र सुरु झालयं. औरंबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विजय निकम चिकटगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. शिवाय जिल्हा परिषदेतले राष्ट्रवादीचे 3 सभापतींनी राजीनामा दिलाय.
अजित पवारांचे राजीनाम्याचे पडसाद राज्यभर उमटतायेत. यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आलाय. राष्ट्रवादीच्या विद्यार्थी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केल. तर अमरावतीतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पुतळा जाळला.
यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आलाय. राष्ट्रवादीच्या विद्यार्थी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केल. तर अमरावतीतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पुतळा जाळला.
अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांचा त्यांना पाठिंबा मिळतोय.याचाच प्रत्यय पुण्यातही आलाय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात अजित पवारांना आता थेट मुख्यमंत्रीच बना अशा आशयाचं होर्डिग लावलंय.