मनसेचं मी ऐकणार नाही,`सुरक्षेत्रा`त जाणारच

शांती आणि सौहार्दता वाढीचा पुरस्कार करतो. मी एक गायिका आहे, कोणी राजकीय नेता नाही. मी चांगल्या माणसांबरोबर काम करतेय

Updated: Aug 31, 2012, 11:03 AM IST

www.24taas.com, मुंबई
पाकिस्तानी गायक आणि स्पर्धकांचा सहभाग असलेल्या सूरक्षेत्रला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. तसेच या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी परिक्षक म्हणून सहभागी होऊ नये, अशी विनंती मनसेतर्फे करण्यात आली आहे मात्र हा इशारा ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी धुडकावून लावला आहे.
हा कार्यक्रम शेजारील देशाबरोबर शांती आणि सौहार्दता वाढीचा पुरस्कार करतो. मी एक गायिका आहे, कोणी राजकीय नेता नाही. मी चांगल्या माणसांबरोबर काम करतेय, हे मला माहिती आहे.
अशा शब्दांत आशाताईंनी खोपकर यांच्या इशाऱ्याला उत्तर दिले आहे. या कार्यक्रमात आपण सहभागी होणारच, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.