महिला शाहीर वैशाली रहांगडालेंचा दुय्यम तमाशा

भंडाऱ्यातील प्रसिद्ध महिला शाहीर वैशाली रहांगडाले तर महाराष्ट्र लोककला मंचाचे अध्यक्ष शाहीर अंबादास नागदेवे हे दोन शाहीर कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते.

Updated: Nov 18, 2011, 05:26 PM IST

झी २४ तास वेब टीम, भंडारा

 

सर्वसामान्य माणसांचे मनोरंजन व्हावे आणि लोप पावत चाललेल्या कलेच्या माध्यमातून ग्रामीण भागात लोककला जिवंत राहावी यासाठी मोठय़ा थाटात भानेगाव येथे गुरुवारला मोठय़ा थाटात दुय्यम तमाशा पार पडला. विशेष आकर्षण म्हणजे भंडाऱ्यातील प्रसिद्ध महिला शाहीर वैशाली रहांगडाले  तर महाराष्ट्र लोककला मंचाचे अध्यक्ष शाहीर अंबादास नागदेवे हे दोन शाहीर कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते.

 

यावेळी तमाशाच्या माध्यमातून राष्ट्रीय जनजागृतीचा संदेश उपस्थित नागरिकांना पटवून देण्यात आला. शिवाय या कार्यक्रमादरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन, कुटुंब नियोजन, ग्राम स्वच्छता अभियान, साक्षरता अभियान, व्यसनमुक्ती, हुंडाबळी, प्रौढ शिक्षण, हागणदारीमुक्त गाव अशा प्रकारच्या दोन्ही तमाशातील कलाकारांनी अभियन करून जनजागृती करण्याचा संदेश दुय्यम तमाशाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला.

 

महाराष्ट्र शासनाने अनुदानात वाढ करावी व तशा प्रकारचा पाठपुरावा शासन दरबारी महासचिव शाहीर सुबोध कानेकर व डॉ. हरिचंद्र बोरकर करीत आहे. मानधनात वाढ करण्याची मागणी महाराष्ट्र लोकसला मंचाने अध्यक्ष शाहीर अंबादास नागदेवे यांनी केली आहे.

Tags: