www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
इंग्लंडहून आलेले 22 डॉक्टर सध्या औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात मोफत प्लास्टीक सर्जरी करत आहेत. आतापर्यंत 85 मुलांच्या ओठांचं आणि टाळूचं विनामूल्य ऑपरेशन या डॉक्टर्सनी केलंय.. अगदी ज्या ऑपरेशनला लाखोरुपयांचा खर्च येतो असे ऑपरेशन्ससुद्धा इथं विनामूल्यच होत आहेत.
स्माईल पिंकी... जन्मतःच व्यंग घेऊन आलेली एका छोट्याशा पटकथेची ही नायिका ऑस्करच्या रुपानं सा-या जगात पोहोचली. तिच्यासारख्या अनेक चिमुरड्यांवर औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात मोफत शस्त्रक्रीया सुरू आहेत.. थेट इग्लंडनहून आलेले 14 ब्रिटीश डॉक्टर आणि त्यांच्या 7 नर्सेस सध्या गोरगरीबांच्या चेह-यावर हसू फुलवताहेत... ब्रिटीश डॉक्टरच्या या ग्रुपलीडरनं भारतात गरीबांसाठी स्वंयसेवा म्हणून हे ऑपरेशन करण्याची इच्छा हेडगेवार रुग्णालयातील काही डॉक्टर्सकडे व्यक्त केली.. हेडगेवार रुग्णालयाने 85 बालके शोधून काढली...आर्थीक परिस्थीती नसलेल्या आणि हे व्यंग सुधारु शकते अशी माहितीही नसलेल्या या बालकांच्या चेह-यावर या डॉक्टर्सच्या चमूने हास्य फुलवलंय...
ज्या मुलांवर हे ऑपरेशन करण्यात आले आहे त्यातील 90 टक्के मुले ही अतिशय दुर्गम भागातून आली आहेत. त्यांच्या पालकांना ऑपरेशनसाठी तयार करण्याचं जिकरीचं काम हेडगेवार रुग्णालयातील डॉक्टर्सनी केलं..
गेल्या चार दिवसांपासून तीन ऑपरेशन रुम्समध्ये हे परदेशी डॉक्टर मुलांचे व्यंग दूर करण्याचं काम करीत आहेत.. त्यांनी परदेशातून सर्व स्वताचे साहित्य सोबत आणले आहे.. इतकंच नाही तर येण्या जाण्याचा आणि आणि राहण्या खाण्याचा खर्च सुद्धा हे परदेशी डॉक्टर स्वत: करीत आहेत....
ज्यांच्या मुलांची ऑपरेशन झालीत त्यांच्या प्रतिक्रीयाच त्यांनी काय़ मिळवलं हे सांगण्यास बोलक्या आहेत. या 22 परदेशी देवदूतांमुळे आज कित्येक मुलांचे जन्माचे व्यंग दूर होण्यास मदत झालीये. स्वप्नातही जो विचार केला नाही तो सत्यात पूर्ण झालाय..म्हणतात ना माणूसकीला ना जात असतो ना देश माणूसकी ही माणसात असते आणि तेच या डॉक्टरांनी सिद्ध केलय..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.