www.24taas.com,इंदापूर
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत मुक्ताफळे उधळली आहेत. स्वत:ला टग्या म्हणाऱ्या अजितदादांचा चांगला तोल सुटला. लोकांना उपदेशाचे ठोस देताना, नके ते बोलून बसलेय. त्यामुळे पुन्हा बेताल व्यक्तव्यामुळे अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
इंदापूर तालुक्यातल्या निंबोडी इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी अजितदादांनी थट्टाट उडविली. महाराष्ट्रात दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. काहींना पाणी मिळत नाही. त्यामुळे लोकशाहीमध्ये न्याय मिळविण्यासाठी उपोषणाचे हत्यार उपसण्यात येते. मात्र, उपोषणाचे अजित पवारांनी टींगल केली. पाणीच नाही, तर आम्ही काय करणार, असा थेट सवाल अजितदादांनी उपोषण कर्त्यालाच केला आहे. तर भारनियमनाबाबतची थट्टाच उडवली. काय म्हणालेत अजितदादा.....
५५ दिवस झाले आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय. कोण देशमुख, का कोण तरी. आ बसलाय ना उपोषणाला. पाणी सुटल का? पाणीच नाही तर सोडणार कोठून? मुतता काय तिथं. सगळ अवघडच. बरं पाणी प्यायला मिळत मिळत नाही, तर लघविलाही होईना? (हशा...)
रात्रीच दोन वाजताच लाईट बंद करता येते. हा माझ्या लक्षात आलंय. कारण मी बघितललंय. रात्री अलिकडेच वीज खूप जात असल्याने रात्री मुल इतकी जन्माला यायला लागलीत. लाईट नसल्यावर काय काम असतेय, की हे असलंच असतं. (प्रचंड (हशा...)
तर मित्रानो, आयला तुम्ही म्हणत असलाल की, अजितदादा दिवसाच टाकून आला की काय? (हशा...) पाणी आहे का पहिलं काय, असं म्हणून मिनरल वॉटरची बाटली उचलून दुसरीकडे ठेवली. हे पाणीच आहे की दुसरं काय.... (हशा...)