www.24taas.com, झी मीडिया, उदगीर
लातूर उदगीर मार्गावरील नळेगाव येथील बस डेपोमध्ये आज सायंकाळी एसटीमध्ये स्फोट होऊन १९ जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
लातूर-उदगीर बसमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. सुरूवातीला हा स्फोट इंजिनमध्ये झाल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, हा स्फोट इंजिनमध्ये झाला नसून बसचा चालकाच्या मागील दुसऱ्या सीटवर हा स्फोट झाला आहे. तसेच हा स्फोट बॉम्ब स्फोट नसल्याचे पोलिस अधिकारी गायकर यांनी स्पष्ट केले.
स्फोटामध्ये विहिरीमध्ये स्फोट करण्यात येणाऱ्या जेलिटीनचा वापर झाल्याची माहिती गायकर यांनी दिली. स्फोटानंतर जेलिटीनचा ब्लास्टनंतर येणारा वास येत असल्याचे गायकर यांनी सांगितले.
स्फोटातील दोघांची प्रकृती गंभीर असून इतरांना लातूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे जर्मन बेकरी स्फोटातील आरोपीला उदगीर येथून अटक करण्यात आली होती.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.