औरंगाबादमध्ये घरफोड्या

औरंगाबादेत सध्या पोलिसांचं राज्य आहे की चोरट्यांचं असा प्रश्न उभा राहिलाय. कारण गेल्या तीन दिवसांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी दिवसाढवळ्या घरफोड्या झाल्या आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 24, 2012, 06:13 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबादेत सध्या पोलिसांचं राज्य आहे की चोरट्यांचं असा प्रश्न उभा राहिलाय. कारण गेल्या तीन दिवसांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी दिवसाढवळ्या घरफोड्या झाल्या आहेत.
चोरट्यांनी गेल्या तीन दिवसांत 70 तोळे सोन्यांचे जवळपास 2 कोटी 14 लाख 650 रुपयांचे दागिने लंपास केलेत. गेल्या तीन दिवसांमध्ये समाधान कॉलनी, सिडको एन-2 कामगार कॉलनीतील दीपाली रेसीडन्सी तसंच चेतनानगरच्या सी-7 या इमारतीमध्ये चोरी झाली आहे.
या सततच्या घटनांनी औरंगाबदकरांमध्ये दहशत निर्माण झाली. तर पोलिस करतायत तरी काय? असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय. या वर्षात औरंगाबादेत तब्बल 179 घरफोड्या झाल्याएत. त्यातील 54 घरफोड्या पोलिसांनी उघडही केल्या मात्र बाकी गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिस अपयशी ठरलेत. त्यामुळे दिवसाढवळ्या घरफोडींच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांचा रोष चांगलाच वाढतोय.