जायकवाडीचं `हिरवं` पाणी पिण्यायोग्य?

जायकवाडी धरणातलं पाणी आता हिरवं पडलंय. हे हिरवं झालेलं हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे का? या धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या लोकांच्या जिवाला धोका आहे का?

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 27, 2013, 10:39 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
जायकवाडी धरणातलं पाणी आता हिरवं पडलंय. हे हिरवं झालेलं हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे का? या धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या लोकांच्या जिवाला धोका आहे का?
मराठवाड्याची तहान भागवणारे अथांग पसरलेलं जायकवाडी धरण... गेल्या वर्षीच्या दुष्काळाने या धरणाची रयाच गेली होती. यावर्षी वरूणराजा चांगला बरसला आणि आता धरणात २३ टक्के पाणीसाठा जमा झालं. मात्र, जायकवाडीमागे लागलेलं शुक्लकाष्ट काही संपण्याचं नावच घेत नाही. धरणात असलेलं पाणी पूर्णपणे हिरवं झालंय. अगदी नजर जाईल तीथपर्यंत पाणी हिरवचं दिसतं. जायकवाडी धरणावर औरंगाबाद, जालना, गेवराई, अंबड शहरांसह सुमारे ३८६ गावं... औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील ५ औद्योगिक वसाहती, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यांतील २ लाख ७७ हजार हेक्टर शेती अवलंबून आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.
नगर जिल्ह्यातील साखर कारखाने आणी गोदावरीत सोडलेले नाले यामुळे धरणातील पाणी हिरवं पडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय तर निसर्गाची पाणी शुद्धीकरण करण्याची नैसर्गिक सायकल कुठे तरी ब्रेक झाल्याने पाण्याचा रंग बदलत असल्याचं पर्यावरण तज्ज्ञांचं म्हणणं आहे. धरणात मासे कमी झालेय, त्यामुळे शेवाळ वाढत चाललंय हे असचं सुरु राहिलं तर जायकवाडी धरणातील पाणी खराब होई शकतो, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. पाणी हिरवं झाल्यानं त्याच्या शुद्धीकरणाला वेळ लागेल. त्यामुळे आधीच तीन दिवसाआड येणार पाणी चार दिवसाआडही होऊ शकतो, अशी शक्यता महापालिकेनं व्यक्त केलीय.

२०११ मध्ये सुद्धा धऱणातील पाणी हिरवं पडलं होत त्यावेळेस या पाण्याचे टेस्टींग सुद्धा करण्यात आले होते, हिरव्या पाण्याने काहीही परिणाम होणार नाही असा अहवाल त्यावेळेस देण्यात आला होता आता यावेळेस अजून सुद्धा पाणी तपासण्यात आलं नाही. त्यामुळे जोपर्यंत पाणी तपासण्यात येत नाही तोपर्यंत हे पाणी पिण्यासाठी वापरण्यास योग्य की अयोग्य? हा प्रश्न कायम आहे. सध्या धरणाची निगा राखणारे अधिकारी या बाबत काहीही बोलण्यास तयार नाही. पाणी तपासल्याववर यावर बोलणार असल्याचं अधिकारी सांगतायत. तोपर्यंत, मात्र जायकवाडी धरणावर अंवलंबून असलेल्या लोकांचा जीव टांगणीला राहणार, हे मात्र निश्चित.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.