जामा मशिदीची रेकीचा संशय, चौकशी पथक आंध्र प्रदेशात

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरात जामा मशिदीची रेकी झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. परभणी पोलीस आणि राज्य एटीएस पथकानंही याची दखल घेतली असून सोलापूर आणि आंध्र प्रदेशमध्येही चौकशीचं एक पथक रवाना झालंय. काय आहे. काय आहे हा सारा प्रकार. एक रिपोर्ट.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 19, 2013, 11:42 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, परभणी
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरात जामा मशिदीची रेकी झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. परभणी पोलीस आणि राज्य एटीएस पथकानंही याची दखल घेतली असून सोलापूर आणि आंध्र प्रदेशमध्येही चौकशीचं एक पथक रवाना झालंय. काय आहे. काय आहे हा सारा प्रकार. एक रिपोर्ट.

मराठावाड्यातले एक संवेदनशील शहर अशी पूर्णाची ओळख आहे. 2004 मध्ये याच शहरातल्या रेल्वे मशीदमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. आता पुन्हा एकदा शहरातल्या पुरातन अशा जामा मशिदीची रेकी झाल्याचा दावा मशीद प्रशासनानं केलाय. 5 ऑक्टोबला या मशीदीत रेड्डी नावाची एक व्यक्ती आली होती.
आपली मन्नत पूर्ण झाली असून आपल्याला मशीदीची फरशी बसवायची आहे, असं त्यांनी सांगितलं. रेड्डीसोबत शहरातली एक स्थानिक व्यक्तीही असल्यानं मशीद व्यवस्थापनानने त्या दोघांना मशीदीमध्ये फिरु दिले. त्यानंतर रेड्डी यांनी आपल्या जवळच्या बॅगेत 7 लाख रुपये असून ही बॅग मशिदीमध्ये ठेवावी असा आग्रह सुरु केला.
मात्र त्यांनी बॅग उघडून दाखवण्यास नकार दिला. त्यानंतर रेड्डी फरार झाला. तर स्थानिक व्यापा-यांनी आपली रेड्डीची ओळखच नसल्याचा दावा केला. हा सारा प्रकार संशयास्पद असल्यानं मशीद प्रशासनानं याची शहर पोलिसांकडे तक्रार केलीय. पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. मशिदीच्या सीसीटीव्हीच्या साह्यानं या प्रकरणाचा तपास त्यांनी सुरु केला आहे. पूर्णा शहराचा संवेदनशीलतेचा इतिहास असल्यानं मशिद प्रशासनाच्या या दाव्याला महत्त्व प्राप्त झालंय. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेनंही याची गंभीरतेनं दखल घेत तपास सुरु केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.