मनसे आमदाराला मारहाण, पोलिसांना झटका

मनसेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांचा अहवाल खुलताबाद कोर्टाने फेटाळून लावलाय. याप्रकरणी हायकोर्टात पिटीशन दाखल करणार असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलंय. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला जावा अशी मागणीही करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 10, 2012, 03:32 PM IST

www.24taas.com, खुलताबाद
मनसेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांचा अहवाल खुलताबाद कोर्टाने फेटाळून लावलाय. याप्रकरणी हायकोर्टात पिटीशन दाखल करणार असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलंय. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला जावा अशी मागणीही करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, पोलिसांनी मारहाण केल्याची हर्षवर्धन जाधव यांची तक्रार खोटी असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र हा दावा फेटाळून लावल्यानं जाधव यांना दिलासा मिळाला आहे.
पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात तक्रार दिली होती त्यात पोलिसांना मारहाण करणे, मुख्यमंत्र्यांची सुरक्षा मोडून घुसखोरी करणे असे आरोप केले होते मात्र आज खुल्ताबाद कोर्टाने हे सगळे आरोप फेटाळले आहे आणि जाधव यांनी पोलिसांना नव्हे तर पोलिसांनीच जाधव यांना मारहाण केल्य़ाचं मान्य केलय..
आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दाखल केलेली मारहाण प्रकरणाची फिर्याद खोटी असून, पोलीस निर्दोष आहेत अशी `बी समरी` खुलताबाद पोलिसांनी स्थानिक मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केली होती आज कोर्टाने यावर निकाल देताना पोलिसांची ही बी समरी फेटाळली आहे..