खासदार सुप्रिया सुळे मारणार कानफाडात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापाठोपाठ त्यांची बहीण सुप्रिया सुळेंचीही ताईगिरी पाहायला मिळाली.. निमित्त होतं राष्ट्रवादीच्या युवती मेळाव्याच्या समारोपाचं. यापुढे युवतींनो थप्पड मारायला सज्ज राहा. दुसरी थप्पड ही राष्ट्रवादी काँग्रेसची असेल, असा दम सुप्रिया सुळे यांनी भरलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 28, 2012, 09:50 PM IST

www.24taas.com,औरंगाबाद
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापाठोपाठ त्यांची बहीण सुप्रिया सुळेंचीही ताईगिरी पाहायला मिळाली.. निमित्त होतं राष्ट्रवादीच्या युवती मेळाव्याच्या समारोपाचं. यापुढे युवतींनो कानफाडात थप्पड मारायला सज्ज राहा. दुसरी थप्पड ही राष्ट्रवादी काँग्रेसची असेल, असा दम सुप्रिया सुळे यांनी भरलाय.
औरंगाबादमध्ये युवती मेळाव्याचा समारोप झाला. यावेळी भाषण करताना महिलांची छेडछाड करणा-यांना सुप्रिया सुळे यांनी जोरदार इशाराच दिलाय. मुलींची छेड काढाल तर एक त्या मुलीची थप्पड तर दुसरी थप्पड राष्ट्रवादी काँग्रेसची असेल असा दमच त्यांनी भरलाय.
त्याआधी सुप्रिया सुळे यांनी यापुढे राज्यात स्त्री भ्रूण हत्यांविरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला आहे. तर बुलडाणा येथे महिलांनाच ए, आवाज चढवून माझ्याशी बोलायचे नाही, अशी अरेरावी केली होती.

बुलडाणा येथे सुप्रिया सुळे राष्ट्रवादी युवती मेळाव्यासाठी आल्या होत्या. त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवून भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. त्यावेळी ए, आवाज चढवून माझ्याशी बोलायचे नाही, असे सुप्रिया यांनी बजावले.
हा खासदार सुप्रिया सुळेंचा चढलेला आवाज ऐकून त्यांच्या गाडीजवळ उभ्या असलेल्या महिलांनी कोण बोलत्येय चढ्या आवाजात, आम्ही तर अगदी साध्या शब्दात आमची भूमिका मांडत आहोत, असे म्हटल्यावर सुळे म्हणाल्या, चला निघा आता.!, असे बजावून गाडी पुढे नेली. त्यामुळे महाराष्ट्रात दादागिरीनंतर ताईगिरी दिसणार आहे, याची चूणुक दिसून आली.