औरंगाबादमध्ये निम्मे पेट्रोल पंप ड्राय!

औरंगाबादमधले निम्मे पेट्रोलपंप ड्राय झाल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. शहरात 60 पेट्रोलपंप आहेत. त्यातल्या 23 पेक्षा जास्त पंपांवर नो स्टॉकच्या पाट्या झळकल्या आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 27, 2013, 07:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
औरंगाबादमधले निम्मे पेट्रोलपंप ड्राय झाल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. शहरात 60 पेट्रोलपंप आहेत. त्यातल्या 23 पेक्षा जास्त पंपांवर नो स्टॉकच्या पाट्या झळकल्या आहेत.
मनमाडच्या पानेवाडी डेपोमधून औरंगाबादला इंधन पुरवठा केला जातो. तिथल्या पाइपलाइन मेंटेनन्सचं काम गेला आठवडाभर सुरू आहे. परिणामी सर्व कंपन्यांना इंधनपुरवठा करणा-या भारत पेट्रोकेमिकल लिमिटेड कंपनीकडे मुबलक साठा नाही. त्यामुळे शहरातले हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइलचे हुडको, सिडको, मुकुंदवाडी, शिवाजीनगर, सावंगी, टीव्ही सेंटर, सेव्हन हिल, गारखेडा,उस्मानपुरा, रेल्वेस्टेशन या भागांतले पेट्रोलपंप आटले आहेत.
त्यामुळे सुरू असलेल्या पंपांवर सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसतायत. आज संध्याकाळपर्यंत पुरवठा सुरु होईल अशी माहिती अधिकारी देत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.