www.24taas.com, विशाल करोळे झी मीडिया औरंगाबाद
रेशनवरच्या वस्तू घेण्यासाठी तुम्हाला आता रेशनकार्डची गरज भसणार नाही तर केवळ तुमचा कार्ड नंबर आणि हातांच्या बोटांचा ठसा त्यासाठी पुरेसा ठरणार आहे...तसेच तुमच्या नावावर आलेल्या रेशनच्या वस्तूंचा दुकानदाराला काळाबाजार करता येणार नाही....
औरंबादच्या बारी कॉलनी रेशन दुकानात रेशन घेण्यासाठी आलेल्या रेशनकार्डधारकांना रेशन देण्याआधी त्यांचा फोटो तसेच बोटांच्या ठशांची नोंद केली जातेय...
कारण यापुढे रेशनकार्ड धारकांना रेशनघेण्यासाठी रेशनकार्डची गरज भासणार नाही..तर त्यासाठी केवळ बोटांचा ठसा पुरेसा ठरणार आहे....रेशनवर वितरीत केल्या जाणा-या वस्तू रेशनकार्डधारकांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशानं सरकारने हे पाऊल उचललं आहे...औरंगाबादमध्ये प्रायोगीकतत्वावर हा प्रकल्प राबवला जात असून त्यासाठी रेशन दुकानदारांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक टॅबलेट आणि थंब इम्प्रेशन बायोमेट्रिक मशिन पुरवण्यात आलंय..या टॅबलेटवर रेशनकार्डधारकांचा डेटा रजिस्टर करण्यात येणार आहे..
या योजनेमुळे रेशन वितरण प्रणालीत पारदर्शकता येणार असून रेशनवरच्या वस्तूंचा काळाबाजार रोखण्यास मदत मिळणार आहे... ग्राहकाची तक्रार आली की शिधावस्तू मिळाली नाही तर ऑनलाईन आम्हाला माहिती मिळणार आहे तात्काळ निराकरण होणार आहे.
रेशनकार्ड धारकाकडून ज्या वस्तू खरेदी केल्या जातील त्याची नोंद टॅबलेटवर केली जाईल..रेशनकार्डधारकांनी या योजनेचं स्वागत केलं आहे..या आधुनिक प्रणालीमुळे रेशन दुकानातून वितरीत झालेल्या मालाचा तपशील जिल्हावितरण कार्यालयाकडं ऑनलाईन उपलब्ध असणार आहे..त्यामुळे बोगस सह्या आणि अंगठे करुन रेशनच्या वस्तूंचा केला जाणारा काळाबाजार रोखण्यास नक्कीच मदत मिळणार आहे..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.