www.24taas.com, झी मीडिया, धुळे
गारपिटीचा कहर आता बळीराजाच्या जीवावर उठलाय. धुळे जिल्हात दोन गारपीटग्रस्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. चैल गावातील चैताराम कुवर आणि कापडणे गावातील सतीश पाटील या दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.
या दोघा शेतक-यांचं गारपिटीमुळं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळं निराशेपोटी त्यांनी मृत्युला कवटाळल्याचं बोलंलं जातंय. मात्र यामुळं मदत देण्यास होत असलेली सरकारची दिंरगाई आता शेतक-यांच्या जीवावर उठू लागल्याचं यानिमित्तानं दिसून आलंय.
धुळे जिल्ह्यात 23 फेब्रुवारीपासून होत असलेला अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. निसर्गाचा अस्मानी हा फटका 9 फेब्रुवारीपर्यंत कायम राहिला आणि त्याने होत्याचे नव्हते करून टाकले. यामुळे मोठा आर्थिक फटका बसला. पाटील यांच्यावर कर्जाचा बोजा होता. तसेच वीजबिलही थकीत आहे.
आता शेतातून आपल्या हाती काहीच येणार नसल्याने हताश झालेल्या पाटील यांनी पहाटे शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. सतीश पाटील यांच्या मागे दोन मुली आणि दीड वर्षाचा मुलगा, पत्नी असा परिवार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.