शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका - राज ठाकरे

राज्य आणि केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे शेतक-यांच्या तोंडाला पानं न पुसता गारपीटग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीय. राज यांनी संकटग्रस्त कुटुंबाला 1 लाख रूपयांची मदत केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 12, 2014, 08:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बीड
राज्य आणि केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे शेतक-यांच्या तोंडाला पानं न पुसता गारपीटग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीय. राज यांनी संकटग्रस्त कुटुंबाला 1 लाख रूपयांची मदत केली.
गारपिटमुळे झालेल्या शेतकऱ्याला मदतीशिवाय शेतक-यांचं वीजबिल आणि पिककर्जही माफ करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केलीय. तसंच या आपत्तीत कोणतही राजकारण न करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
लातूर जिल्ह्यात गारपीटग्रस्त शेतक-यांची राज ठाकरे यांनी विचारपूस केली. निलंगा तालुक्यात मसलगा, निटूर, औसा तालुक्यात लामजना आणि ऱेणापूर तालुक्यात शेतीपिकांची त्यांनी पाहाणी केली.
दरम्यान, बीडमधील परळी येथील मृतव्यक्तींच्या कुटुंबियांना राज ठाकरे यांनी केली १ लाख रूपयांची मदत केली आणि त्यांचे सांत्वन केले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.