शिवसैनिक म्हणतात, बाळासाहेब `एकटे टायगर`

`एक था टायगर` नंतर आता खरी बातमी आहे ती मुंबईतल्या टायगरची... मुंबईत दादरमध्ये परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकटा टायगर, एकटा वाघ अशी मोठमोठी होर्डिंग्ज लावली आहेत.

Updated: Aug 23, 2012, 08:26 PM IST

www.24taas.com, मुबंई
`एक था टायगर` नंतर आता खरी बातमी आहे ती मुंबईतल्या टायगरची... मुंबईत दादरमध्ये परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकटा टायगर, एकटा वाघ अशी मोठमोठी होर्डिंग्ज लावली आहेत.
`एक था टायगर` या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मात्र त्यानंतर आता याच सिनेमाचा वापर हा राजकीय नेत्यांसाठीही केला जात आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो असलेल्या बॅनरखाली `एकटा टायगर`, `एकटा वाघ` अशी बिरूदावली लावण्यात आली आहे. मनसे हिंदुत्वाच्या वाटेवर आरूढ होत असल्याच्या शक्यतेने ही पोस्टरबाजी केली असल्याची चर्चा आहे.