www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच्या निधनाला १७ नोव्हेंबरला एक वर्षं पूर्ण होतंय. शिवाजी पार्कवर ज्या ठिकाणी बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं अत्यंत आकर्षक असं स्मृतिउद्यान तयार करण्यात आलंय.
सध्या या स्मृतिउद्यानावर शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळ असं या उद्यानाचं नाव ठेवण्यात आलंय. या उद्यानात विविध फुलझाडं लावण्यात आलीयत. त्यामध्ये तुळस, पॉईण्ट सिटीया, गोल्डन सायप्रस, ऍलामेंडा, मिनी एक्सोरा, झेंडू, फिट्युनिया, लॅटिना, फायकस आणि पाम या फुलांच्या झाडांची लागवड करण्यात आलीय.
उद्धव ठाकरे यांनी काल या स्मृतिउद्यानाची पाहणी केली.... आणि सगळ्या व्यवस्थेचा आढावा घेतला. तसंच काही सूचनाही केल्या. १७ नोव्हेंबरला लाखो शिवसैनिक देशाच्या कानाकोप-यातून शिवाजी पार्कवर येणार आहेत. त्यासाठी महापालिकेनं चोख व्यवस्था ठेवलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.