मनोहर जोशींना हे बोलणं शोभत नाही- आबा

लोकसभा अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीनं कायदा हातात घेण्याची भाषा करणं अयोग्य असल्याची टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलीय.

Updated: Nov 26, 2012, 07:23 PM IST

www.24taas.com, मुंबई
लोकसभा अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीनं कायदा हातात घेण्याची भाषा करणं अयोग्य असल्याची टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलीय.
शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुखांचं स्मारक झालं नाही, तर प्रसंगी कायदा हातात घेऊ, असं वक्तव्य मनोहर जोशींनी केलं होतं. त्यावर आर. आर.पाटील यांनी सडकून टीका केलीय. तर बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत शिवसेना नेते मनोहर जोशींचे वक्तव्य तपासणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय.
कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. बाबाळासाहेबांचे स्मारक शिवजी पार्कवरच होणार प्रसंगी कायदा हातात घेऊ, असा इशारा मनोहर जोशींनी काल दिला होता.