बाळासाहेबांचे संपूर्ण जीवन योद्ध्यासारखेच - अमिताभ

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृतीत बिघडली आहे. मातोश्रीवरच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाळासाहेबांच्या प्रकृतीची सगळ्यांना चिंता असल्याने शिवसेनेचे नेते, पदाधिकारी मातोश्रीवर पोहचले आहेत. अमिताभ बच्चन यांनी काल मातोश्रीवर उपस्थिती लावली होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिलीय, बाळासाहेब संपूर्ण जीवन योद्ध्यासारखेच जगले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 15, 2012, 08:26 AM IST

www.24taas.com,मुंबई
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृतीत बिघडली आहे. मातोश्रीवरच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाळासाहेबांच्या प्रकृतीची सगळ्यांना चिंता असल्याने शिवसेनेचे नेते, पदाधिकारी मातोश्रीवर पोहचले आहेत. अमिताभ बच्चन यांनी काल मातोश्रीवर उपस्थिती लावली होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिलीय, बाळासाहेब संपूर्ण जीवन योद्ध्यासारखेच जगले.
बाळासाहेबांच्या प्रकृतीची सगळ्यांना चिंता लागली आहे. सध्या त्यांच्यासाठी प्रार्थनेची गरज आहे. मला ज्यावेळी कुली सिनेमा दरम्यान अपघात झाला, त्यावेळी मला नेणारी अँब्युलन्स शिवसेनेचीच होती. बोफोर्स प्रकरणी नाव आल्यावर त्यांनीच मला धीर दिला. बाळासाहेब संपूर्ण जीवन योद्ध्यासारखेच जगले, असे अमिताभ यांनी ट्विट केले आहे.
बंगळुरू येथे ‘कुली’ सिनेमा दरम्यानच्या अपघातानंतर ब्रिच कॅंडी हॉस्पीटलमध्ये मला ते भेटायला आले होते. माझ्या तब्बेतीची काळजी घेतली. त्यांनी माझ्यासाठी कार्टुन आणले होते. त्यात म्हटले होते. हार गए यमराज. तू घाबरू नकोस आणि काळजी करू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर. तू एक कलाकार आहेस. तू चांगले काम करीत आहेस.
बोफोर्स घोटाळ्याच्या आरोपाच्यावेळी मला त्यांनी मातोश्रीवर बोलविले, तू सर्व खरं सांग. त्यावेळी त्यांनी मला धीर दिला. आजची रात्र माझ्यासाठी सर्वात मोठी होती.