हल्लीच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक जण कामाच्या व्यापात इतका बुडालेला असतो की मनःशांती आपल्या जीवनातून हद्दपार झाल्यासारखी वाटते. कामाच्या गडबडीत स्वतःला वेळ देणं दुरापास्त झालं आहे. या मानसिक तणावातून बाहेर पडायचं असेल तर, आपण राहत असलेल्या वास्तूत आम्ही सूचवत असलेले लहान मोठे बदल करून पाहा.. आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवा...
- घरात कोळीष्टक बनू देऊ नका. यामुळे मानसिक तणाव कमी होईल.
- स्वयंपाक घरातील दगड काळा असू नये.
- स्वयंपाक घरातच जेवा.
- रात्री खरकटी भांडी ठेवू नयेत.
- संध्याकाळच्या वेळेस अंघोळ तसंच जेवण करू नका
- संध्याकाळी घरात सुगंधी तसंच पवित्र धूप करा.
- दिवसातून एकदा चांदीच्या पात्रातून पाणी प्या. यामुळे तापट स्वभावावर नियंत्रण राहाते.
- दिवाणखान्यात मद्यपान करू नका. नाहीतर आजारी पडण्याची किंवा भयानक स्वप्न पडण्याची चिंता निर्माण होते.
- घरात काटेरी झाडं लावू नका.
- स्वयंपाक घरात अग्नि आणि पाणी एकत्र ठेवू नका.
- आपल्या घराला गडद रंग देवू नका.
- घरात कुणी रुग्ण असल्यास केशर घोळवलेली वाटी त्याच्या खोलीत ठेवावी. यामुळे रुग्णाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होते.
- घरात नेहमी सुगंध दरवळत राहिल अशी व्यवस्था करा. सुंगधी वातावरणामुळे चित्तवृत्ती प्रसन्न राहातात.
अशा छोट्या उपायांमुळे आपल्याला मनःशांती लाभू शकते.