शत्रूंचा नायनाट करण्यासाठी...

कुणी तुमच्या कामात अडथळे आणतंय का? किंवा कुणी तुमचं वाईट चिंततंय असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला कायम शत्रूंची भीती वाटत राहाते का? जर तुम्हाला असं खरंच वाटत असेल की आपले हितशत्रू आहेत.

Updated: Jul 9, 2012, 04:09 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

कुणी तुमच्या कामात अडथळे आणतंय का? किंवा कुणी तुमचं वाईट चिंततंय असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला कायम शत्रूंची भीती वाटत राहाते का? जर तुम्हाला असं खरंच वाटत असेल की आपले हितशत्रू आहेत. तर त्यांना घाबरू नका.

 

बऱ्याचवेळा आपण कुणाचं वाईट करत नसतो, तरीही आपला होत जाणारा उत्कर्ष काही जणांच्या डोळ्यांना खुपत असतो. असे लोक आपले शत्रू बनू लागतात. काहीवेळा उघडपणे तर कधी कधी आडून, गोड बोलून आपलं अहित चिंतत असतात. अशा सर्वच जाणत्या-अजाणत्या शत्रूंपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एख सोपा उपाय आहे. खाली दिलेला मंत्र पाहा.

 

मर्कटेश महोत्साह सर्वशोकविनाशन।

शत्रून संहर मां रक्ष श्रियं दापय मे प्रभो।।

 

विधी-

रोज सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपून, स्नान करून, स्वच्छ वस्त्र नेसावीत. हनुमानाचं चित्र आणि हनुमान यंत्र समोर ठेवून पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसावं. हनुमान यंत्रासमोर बसून वरील मंत्र म्हणावा. मंत्र म्हणातानाशेंदूर चढवावा आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा. या मं6चा जप करण्यासाठी लाल स्फटिकाची माळ वापरावी.

 

या पद्धतीने मंत्र म्हटल्यास तुमच्या सर्व शत्रूंचा त्रास मिटतो. कामात अडथळे येत नाहीत. वारंवार कामात तुम्हाला कुणी आडकाठी करत नाही. अशा प्रकारे तुमच्या शत्रूंचा तुम्हाला होणारा त्रास मिटतो.