मुंबई : जगात सगळ्याच संस्कृतीमध्ये काही गोष्टी या लकी मानल्या जातात. एखादं झाड, प्राणी, नंबर किंवा अनेक अशा गोष्टी आहेत ज्या वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये लकी असल्याची समज आहे.
15 गोष्टी ज्या मानल्या जातात लकी :
१. कासव : चायनिज संस्कृतीमध्ये कासव हा खूपच लकी मानला जातो. कासव जर तुमच्या दिशेने येत असेल तर तुमचं आयुष्य खूप दीर्घ आहे आणि तुम्हाला जीवनात खूपच चांगल्या संधी मिळणार असल्याचं मानलं जातं.
२. घोड्याची नाल : १० व्या शतकापासून घोड्याची नाल ही वाईट गोष्टींना घरापासून दूर ठेवतं असं मानलं जातं.
३. चिमणी : भारतीय संस्कृतीमध्ये चिमणीने जर तुमच्या घरावर घरटं बांधलं तर ते शुभ मानलं जातं. यामुळे माणून अजून श्रीमंत होतो असं मानलं जातं.
४. लकी लीफ : ही पाने आयर्लंड या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे. आयरिश परंपरेनुसार ही पानं पवित्र मानली जातात. हे पान वडील, मुलगा, पवित्र आत्मा आणि देवाची कृपा या चार गोष्टींचं प्रतिनिधीत्व करतं असं मानलं जातं.
५. चंद्रकोर : इजिप्त या देशात चंद्रकोर हे ईश्वराची आई असल्याचं मानलं जातं. हे आई आणि मुलांसाठी लकी आहे असल्याचं म्हटलं जातं. इस्लाम धर्मातही याला विशेष महत्त्व आहे.
६. क्रमांक ७ : अनेक संस्कृतींमध्ये ७ हा क्रमांक शुभ अंक असल्याचं मानलं जातं. ७ हा अंक ज्ञान, सन्मान, गौरव, आशीर्वाद, शक्ती आणि देवाचा अंक असल्याची समझ आहे. जपानमध्येही हा अंक शुभ असल्याचं मानलं जातं.
७. तुटता तारा : अनेक सिनेमांमध्ये तुटता ताऱ्याकडे कोणताही इच्छा मागितली की ती पूर्ण होते असं दाखवलं जातं. ग्रीक खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा तुटता तारा हा पुथ्वीवरून दिसतो तेव्हा ईश्वर हा तुमची इच्छा खूप लक्ष देऊन ऐकण्यासाठी येतो.
८. हत्ती : प्रवास करत असताना जर हत्ती दिसला तर तुमचा प्रवास यशस्वी होईल असं मानलं जातं. हिंदू देवतांमध्ये गणेशाला हत्तीचं डोकं आहे त्यामुळे तो लकी मानला जातो. तसेच हत्ती हा ज्ञान, शक्ती, निष्ठा, बुद्धिमत्ता, शक्ती आणि एकांताचं प्रतिक मानलं जातं.
९. डॉल्फिन : अमेरिकेत डॉल्फिन हा मासा संरक्षण आणि भाग्याचं प्रतिक मानलं जातं. प्राचीन काळात डॉल्फिन मासे समुद्रात दिसले तर भूभाग हा जवळ असल्याचं खलाशींना संकेत मिळायचं.
१०. सोनकिडा : हा भाग्य, शांती आणि शुभ वार्ताचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे तो दिसला की त्याला मारू नये अशी समज आहे. जर तो घरात आढळला तर पैसा मिळणार असल्याचं समजलं जातं.
११. ससा : युरोप, आफ्रिका, चीन, उत्तर आणि दक्षिण अमेरिका या जगातील विविध भागात सस्याचे पाय भाग्यवान मानले जातात.
१२. इंद्रधनुष्य : इंद्रधनुष्य हे ही लकी मानलं जातं. इंद्रधनुष्याच्या शेवटी सोन्याचं भांड सापडतं अशी एक समजूत आहे.
१३. बेडूक : प्राचिन इजिप्तमध्ये बेडूक हा नवजात बाळांचं संरक्षण करतं अशी समजूत आहे. बेडूक हा खरे मित्रांना शोधण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकणारा प्रेम शोधण्यासाठी मदत करतो असं मानलं जातं.
१४. अंडी : प्राचीन काळात अंड हे वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी मदत करतो अशी समज होती.
१५. पक्षी : एखादा पक्ष्याने जर आपल्या अंगावर घाण केली तर त्याला लकी मानलं जातं. त्यामुळे माणून श्रीमंत होतो अशी समज आहे. पक्षाने डोक्यावर किंवा कारवर घाण केली तर त्याचा तिरस्कार करू नये असं म्हटलं जातं.