जन्म वारावरून जाणून घ्या तुमचं व्यक्तीमत्व...

तुमचं व्यक्तीमत्व कसं आहे हे तुमच्या जन्म दिवसाच्या वारावरूनही ओळखता येऊ शकतं...

Updated: Dec 19, 2015, 05:39 PM IST
जन्म वारावरून जाणून घ्या तुमचं व्यक्तीमत्व...  title=

मुंबई : तुमचं व्यक्तीमत्व कसं आहे हे तुमच्या जन्म दिवसाच्या वारावरूनही ओळखता येऊ शकतं...

तुमचा जन्म रविवारी झालाय का? असेल तर तुमचं व्यक्तीमत्व खूपच कल्पनारम्य आहे. तुमच्या आजुबाजुच्या गोष्टींचा खोलवर जाऊन धांडोळा घेणं तुम्हाला आवडतं. नव्या गोष्टी आत्मसात करणंही तुम्हाला खूप आवडतं.

तुमचा जन्म जर सोमवारी झाला असेल तर तुम्ही खूप संवेदनशील आहात... तितकेच भावनिक आहात. शिवाय, कोणत्याही बदलाला तुम्ही सहज सामोरे जाता... इतकंच नाही तर तुम्ही फास्ट लर्नरही आहात... एखादी गोष्टी लवकर आकलन तुम्ही करू शकता.   

तुमचा जन्म जर मंगळवारी झाला असेल तर तुम्ही खूप प्रयोगशील आणि आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या गोष्टींबद्दल जिज्ञासू आहात. तुम्ही 'अॅक्टीव्ह' बालक आहात. एनर्जी तुमच्या प्रत्येक कणाकणात भरलीय. 

तुमचा जन्म बुधवारी झाला असेल तर तुम्ही खूपच बडबडे आहात. गप्पा मारणं हा तर तुमचा आवडता छंद... तुमचं व्यक्तीमत्व 'कूल' असेल.... आणि हसू नेहमी तुमच्या चेहऱ्यावर दिसून येत असेल. तुम्ही जिज्ञासूही आहात.

तुमचा जन्म गुरुवारी झाला असेल तर तुम्ही खूप आनंदी व्यक्तीमत्वाचे व्यक्ती आहेत. हसायला तुम्हाला खूप आवडतं... आणि बडबड करायलाही... 

शुक्रवार हा तुमचा जन्म वार असेल तर तुम्ही खूप हुशार आहात. आजुबाजुच्या गोष्टींवर नजर ठेवून त्या न्याहाळत बसणं हा तुमचा आवडता छंद आहे. तुम्ही खूप स्वच्छंदी आहात. 

तुमचा जन्म शनिवारी झाला असेल तर तुम्हाला पोट धरून हसायला खूप आवडतं... पेन्टींग आणि रेखाटन यात तुमचा हातखंडा असू शकतो... पण, याच वेळी तुम्ही खूप संवेदनशील आहात.