`लकी नंबर` कोणता अंक आहे करिअरसाठी लकी

अंकशास्त्राचा आपल्या जीवनावर भरपूर प्रभाव पडत असतो. मात्र अंकशास्त्राचे कार्य कशा पध्दतीने चालते याचे फारसे ज्ञान आपल्याला नसते.

Updated: Apr 24, 2013, 08:07 AM IST

www.24taas.com
अंकशास्त्राचा आपल्या जीवनावर भरपूर प्रभाव पडत असतो. मात्र अंकशास्त्राचे कार्य कशा पध्दतीने चालते याचे फारसे ज्ञान आपल्याला नसते.
एक : तुमचा जन्म क्रमांक `एक` असेल तर तुमची आवड सृजनात्मक असेल आणि तुम्ही काही नवनिर्माण करू शकाल. तुम्ही डिझायनर, ग्रुप लीडर, फिल्म मेकर किंवा संशोधक म्हणून प्रसिद्धी मिळवू शकाल.
दोन : `दोन` हा जर तुमचा लकी क्रमांक असल तर तुम्ही नृत्य, संगीत, कविता आणि गणित या क्षेत्रात चांगले चमकू शकाल. संशोधनपर कार्य ही करण्‍याकडे तुमचा कल दिसून येईल.
तीन : चंचलता हे `तीन` क्रमांकाचे विशेष म्हणता येईल. कम्युनिकेशन आणि मनोरंजनच्या क्षेत्रात यश मिळवू शकतात. अभिनय, गायन, लेखन आणि पत्रकारिता हे विषय करियरसाठी निवडता येतील. फॅशन डिझायनिंग किंवा मॉडलिंगमध्ये तुम्हाला नशीब आजमावून पाहायला काहीच हरकत नाही.
चार : तुमचा लकी क्रमांक चार असेल तर तुम्ही व्यावहारिक व आध्यात्मिक विचारांचे आहात. इंजीनियर, बिल्डर, प्रोग्रॅमर, अकाऊंटन्ट, आर्किटेक्ट, इकोलॉजिस्ट किंवा मॅकेनिक बनू शकतात.
पाच : `पाच` हा क्रमांक अचिव्हमेंट देणारा आहे. स्वप्न पूर्ण करणारा आहे. पाच हा लकी क्रमांक असलेली व्यक्ती संशोधक, गुप्तहेर, प्रकाशक, जाहिरातदार, स्ट्रॉकीस्ट, ट्रॅव्हल्स एजेन्सी मालक, लेखक होण्‍याची शक्यता अधिक असते.
सहा : `सहा` हा लकी क्रमांक आणि `समाजसेवा` हे गणित ठरलेले आहे. मुळात तो तुमचा स्वभाव आहे आणि सेवकाच्या नात्याने तुम्ही प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ता, मेडिकल प्रोफेशनल, किंवा कुकींगमध्ये चांगली कामगिरी करू शकता.
सात : `सात` हा लकी क्रमांक असणारी व्यक्ती अंतर्ज्ञानी तसेच खूप अभ्यासू असते. वैज्ञानिक, मनोचिकित्सक, संशोधक, लेखक म्हणून प्रसिद्धी मिळवू शकता.
आठ : `आठ` हा लकी क्रमांक असलेल्यामध्ये `नेतृत्व` हा गुण असून दुसर्‍यांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती असते.सेल्स मॅनेजर, बँकर, स्टॉक ब्रोकर, व्यवस्थापन सल्लागार किंवा मार्गदर्शक म्हणून आपले करियर घडवू शकता.
नऊ : `नऊ` हा लकी क्रमांक असणारी व्यक्ती समाजात आपल्या कतृत्त्वाच्या जोरावर प्रसिध्दी मिळवत असते. तुम्ही प्राध्यापक, फिजिशियन, सा‍माजिक कार्यकर्ता, वकील किंवा चित्रकारच्या रूपात प्रसिद्धी प्राप्त करू शकता.