www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्या जीवनात वेळेला खूप महत्त्व आहे. वेळेचा उपयोग एखादा मनुष्य कशा रीतीने करतो, त्यावर त्याचे मोठेपण अवलंबून असते. एखाद्याचे पैसे उसने घेणे आणि परत न करणे याला आपण फसवणूक म्हणतो. दिलेली अपॉईंटमेंट न पाळणे हेही तेवढंच आक्षेपार्ह आहे, किंबहुना थोडं जास्तच. कारण, पैसे उशिरा का होईना, पण परत करता येतात. एखाद्याचा फुकट घालवलेला वेळ मात्र आपण कधीच परत करू शकत नाही. पाच येतो म्हटल्यावर आपण ठीक पाचला हजर राहायलाच पाहिजे! दोन मिनिटं उशीर झाला तरी तो उशीरच!
झेंडावंदनासाठी एक-एक, दोन-दोन तास बिचारी मुलं उन्हात उभी असतात, अध्यक्ष उशिरा येणार म्हणून. बंदोबस्तासाठी पोलिसांची तासन्तास रखडपट्टी होते आणि अचानक मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम बदलतो. जेवढा गायक मोठा तेवढा तो श्रोत्यांना जास्त ताटकळत ठेवतो. हे सगळं बदलायला हवं! ठरलेल्या दिवसापूर्वी मालाची डिलिव्हरी झाली नाही, तर वॉल मार्टसारखी कंपनी लक्षावधी डॉलर्सची ऑर्डर कॅन्सल करते. सर्जन ऑपरेशन थेटरमध्ये उशिरा आला तर अमेरिकेतला रोगी त्याला कोर्टात खेचू शेकतो.
दिलेली वेळ पाळणं याचाच अर्थ दिलेला शब्द पाळणं आणि आपल्या शब्दाची किंमत म्हणजेच आपली स्वतःची किंमत!
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.