डोळ्यांचा रंग सांगतो तुमचा स्वभाव

 तुमच्या डोळ्यांचा म्हणजे बबुळांचा रंग हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरचं काही सांगतो. काळ्या रंगाचे डोळे असणारे व्यक्ती रात्री प्रमाणे गूढ असतात. तर तांबूस पिंगट रंगाचे डोळे असणाऱ्या व्यक्ती या उत्कट म्हणजे स्पॉन्टेनिअस असतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

Updated: Sep 2, 2016, 10:08 PM IST
डोळ्यांचा रंग सांगतो तुमचा स्वभाव  title=

मुंबई :  तुमच्या डोळ्यांचा म्हणजे बबुळांचा रंग हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरचं काही सांगतो. काळ्या रंगाचे डोळे असणारे व्यक्ती रात्री प्रमाणे गूढ असतात. तर तांबूस पिंगट रंगाचे डोळे असणाऱ्या व्यक्ती या उत्कट म्हणजे स्पॉन्टेनिअस असतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

इंडियाटॅरो.क़ॉमचे अध्यामिक तज्ज्ञ मधु कोटिया यांनी आपल्याला डोळ्यांच्या रंगावरून व्यक्तीचे स्वभाव सांगितले आहे. 

- काळ्या रंगाचे डोळे :  काळ्या रंगाच्या डोळ्यांच्या व्यक्ती खूप गूढ असतात आणि त्यांना मोठे अंतर्ज्ञान असते. ते खूप विश्वासू असतात आणि तुमचे गुपीत कधीच जगासमोर खुले करत नाही. ते खूप जबाबदार आणि एकनिष्ठ असतात. ते खूप कष्टाळू आणि आशावादी असतात. त्यांना आपले महत्व काय आहे हे लोकांना दाखवण्याची पद्धत योग्य माहीत असते. 

- तपकीरी रंगाचे डोळे - तपकिरी रंगाचे डोळे असणाऱ्या व्यक्ती आकर्षक, आत्मविश्वासू आणि क्रिएटिव्ह असतात. ते निर्धार करत असल्याने ते त्या प्रमाणे ते वागतात. त्यामुळे त्यांना काहीवेळा अडचणींचा सामना करावा लागतो. 

- तांबूस पिंगट रंगाचे डोळे - तांबूस पिंगट रंगाचे डोळे असणाऱ्या व्यक्ती या उत्कट म्हणजे स्पॉन्टेनिअस असतात. फन लव्हिंग आणि साहसी असतात. ते एका प्रवाहा प्रमाणे असतात, त्यामुळे ज्या गोष्ट त्या प्रवाहात येतात ते स्वीकारत जातात. या व्यक्ती एकसारखेपणाने लवकर बोअर होतात. त्यांचे सौंदर्य क्वचित अनेकांना मोहीत करते. तसेच त्यांचे नाते बराच काळ राहत नाही. तुम्ही त्यांच्यासाठी स्पेशल असाल तर ते नाते ठेवतात. 

- करड्या रंगाचे डोळे (ग्रे)  :  करड्या रंगाचे डोळे असणाऱ्या व्यक्ती या वर्चस्ववादी असतात. तसेच शक्तीशाली आणि सभ्य असतात. ते खूप आक्रमक नसतात पण ते जे काही करतात त्या सर्वस्व झोकून देतात. प्रेम आणि रोमान्स सिरिअसली घेतात. त्याची आत्मबल, कोणत्याही घटनेचे पृथ्थकरण करण्याची वृत्ती आणि तटस्थ भूमिका यामुळे कोणत्याही परिस्थितीवर नेतृत्त्व करण्याची कला या व्यक्तींमध्ये आहे. 

- हिरवे डोळे :  हिरवे डोळे असणाऱ्या व्यक्ती या खूप बुद्धिमान असतात. तसेच त्या जिज्ञासू आणि स्वानंदी असतात. ते जे काही करतात ते खूप पॅशनेटली करतात, ते आनंददायी आणि सुंदर असतात. ते लवकर शंका घेऊ शकतात आणि त्यामुळे त्यांचे वागणे नकारत्मक लवकर होते. 

- निळे डोळे - निळ्या डोळ्यांचे व्यक्ती खूप आकर्षक, शांत आणि स्मार्ट असतात. ते एखाद्याशी संबंध निर्माण करतात तर ते बराच काळ ठेवतात. दुसऱ्या आनंदी ठेवण्यासाठी ते द्या भावनेने आणि प्रामाणिकपणे वागतात. ते स्वतः पेक्षा इतरांचा अधिक विचार करतात. तसेच कोणत्याही गोष्टीकडे सखोल दृष्टीकोनातून पाहतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.