वाईट स्वप्न पडत असतील तर करा हे ८ सोपे उपाय

स्वप्न पाहणं खूप चांगलं असतं. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात स्वप्न पाहत असतात. पण काही स्वप्न आपल्याला घाबरवतात. अनेक जणांना रात्री झोपेत वाईट स्वप्न पडतात. अशा वाईट स्वप्नांपासून दूर राहण्यासाठी अग्निपुराणात काही सोपे उपाय सांगितले आहेत. जाणून घ्या हे उपाय...

Updated: Aug 23, 2016, 09:48 PM IST
वाईट स्वप्न पडत असतील तर करा हे ८ सोपे उपाय title=

मुंबई: स्वप्न पाहणं खूप चांगलं असतं. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात स्वप्न पाहत असतात. पण काही स्वप्न आपल्याला घाबरवतात. अनेक जणांना रात्री झोपेत वाईट स्वप्न पडतात. अशा वाईट स्वप्नांपासून दूर राहण्यासाठी अग्निपुराणात काही सोपे उपाय सांगितले आहेत. जाणून घ्या हे उपाय...

१. लगेच झोपून जा

वाईट किंवा घाबरवणारं स्वप्न आलं तर साधारपणे आपली झोप उघडते. अर्ध्यारात्रीही अशा स्वप्नानं दचकून उठतो. अग्निपुराणानुसार असं स्वप्न पडल्यानंतर झोप उघडली तर पुन्हा झोपून जा, असं केल्यानं ते डोक्यातून निघून जातं. सकाळी उठल्यावर रात्री पडलेल्या त्या स्वप्नाबद्दल काहीच आठवत नाही आणि शांत मनानं आपण दिवसाची सुरूवात करू शकतो. 

२. दुसऱ्यांना सांगू नये
जवळपास सगळ्यांचीच सवय असते की, आपल्याला पडलेल्या स्वप्नाबद्दल आपण जवळच्या व्यक्तीला सांगतो. पण शास्त्रानुसार काही बाबी गुप्त ठेवायला हव्यात. वाईट स्वप्न त्याचवेळी विसरून जायला हवं, ते कोणालाही सांगू नये. आपण जर वाईट स्वप्न लक्षात ठेवलं, कुणाला सांगितलं तर सतत त्याचबद्दल विचार करता, त्यामुळं कुणाला ते सांगू नये. 

३. आंघोळ करावी
शास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करण्याचं महत्त्व सांगितलं गेलंय. आंघोळ केल्यानं मनुष्य शारीरिक आणि मानसिक दोन्ही पद्धतीनं शुद्ध होतो. वाईट स्वप्न दूर सारण्यासाठी मनुष्याला मानसिक रुपानं शुद्ध असणं खूप गरजेचं असतं. आंघोळ केल्यानं ते थांबू शकतं. ज्या व्यक्तीला नेहमी वाईट स्वप्न पडतात, त्यांनी रोज सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करायला पाहिजे. 

४. ब्राह्मणांची पूजा
ब्राह्मणांची पूजा केल्यानं मनुष्याला आपल्या कर्मातून मुक्ती मिळते आणि स्वप्न दोषाचाही नाश होतो. ब्राह्मणाची पूजा केल्यानं त्याला दान दिल्यानं वाईट स्वप्नाच्या समस्येतून मुक्ती मिळू शकते.

५. तीळेनं होम करावं
अनेक वेळा स्वप्नाचं कारण घराच्या आजूबाजूला असणारी नकारात्मक ऊर्जा असते. घरात सुख-शांती राहावी यासाठी नकारात्मक ऊर्जेला घरातून दूर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तीळेनं होम केल्यानं हे होऊ शकतं. होमाच्या धुरानं घरातील वातावरण शुद्ध होतं. सांगितलं जातं की, ज्या घरात नियमित होमहवन केलं जातं, तिथं देवांचा वास असतो. नियमित रुपानं तीळेनं होम केल्यानं वाईट स्वप्नांपासून वाचलं जावू शकतं.

६. ब्रह्मा, विष्णू आणि शिवाची पूजा करावी
ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांना त्रिदेव म्हटलं जातं. संपूर्ण जगाची निर्मिती, संचालन आणि विनाश यांच्यामुळेच चालू असतं, असं मानलं जातं. आपल्या आयुष्यातील कोणतीही समस्या दूर करू शकतात, म्हणून रोज त्रिदेवांची पूजा करावी. नकारात्मक शक्ती या पूजेमुळं दूर जाते. 

७. महामृत्युंजय मंत्राचा पाठ करणं
भगवान शंकराला कालो का काल म्हटलं जातं. भगवान शिवाच्या कृपेनं मनुष्याच्या स्वप्न दोषांचाही नाश होतो. महामृत्युंजय मंत्र शंकराचा प्रभावशाली मंत्र आहे. त्यामुळं महामृत्युंजयाच्या जपानं मनुष्याची वाईट स्वप्नातून मुक्ती मिळते.

८. सूर्याला जल अर्पण करावं
सूर्य देवाला जल अर्पण करणं हे हिंदू धर्मात खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं. सूर्य देवाला जल अर्पण केल्यानं स्वप्न दोषातून मुक्ती मिळू शकते. सूर्याला जल अर्पण केल्यानं पाण्याचे थेंब मनुष्याच्या शरीराला स्पर्श करतात. त्यामुळं मनुष्याची तन आणि मनाची शुद्धी करतात. रोज सूर्याला जल अर्पण केल्यानं मनुष्याचं मन आणि विचार शुद्ध होतात आणि वाईट स्वप्न पडणं बंद होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.