लक्ष्मीपूजनासाठी हा आहे मुहूर्त

 आश्विन अमावास्या प्रदोषकाली असेल त्या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन केले जाते. आज सायंकाळी ६ वाजून 5 मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत प्रदोषकालात लक्ष्मीपूजन करावयाचे आहे. 

Updated: Oct 30, 2016, 07:42 AM IST
लक्ष्मीपूजनासाठी हा आहे मुहूर्त title=

मुंबई :  आश्विन अमावास्या प्रदोषकाली असेल त्या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन केले जाते. आज सायंकाळी ६ वाजून 5 मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत प्रदोषकालात लक्ष्मीपूजन करावयाचे आहे. 

यादिवशी घरासमोर रांगोळी काढली जाते. याविषयी पुराणात एक कथा आहे. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र फिरते. आणि आपल्या निवासासाठी जागा शोधू लागते. 

जिथे स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रीयता असेल तेथे ती आकर्षित होते. तसेच ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी,सदाचारी,क्षमाशील, माणसे राहतात तेथे वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते. चांगल्या मार्गाने मिळवलेल्या आणि चांगल्या मार्गाने खर्च होणा-या पैशालाच 'लक्ष्मी ' म्हणतात.