आपले ओठ पाहा, जाणून घ्या तुम्ही धनवान की राहणार तंगी

 तुम्ही पाहिले असेल की प्रत्येक व्यक्तीचा चेहरा हा एकमेकांपेक्षा वेगळा असतो. तसेच त्यांचे ओठही वेगवेगळे असतात. 

Updated: Aug 12, 2016, 08:04 PM IST
आपले ओठ पाहा, जाणून घ्या तुम्ही धनवान की राहणार तंगी title=

मुंबई :  तुम्ही पाहिले असेल की प्रत्येक व्यक्तीचा चेहरा हा एकमेकांपेक्षा वेगळा असतो. तसेच त्यांचे ओठही वेगवेगळे असतात. 

ओठांचा आकार केवळ सौंदर्यच सांगत नाही तर तुमचे व्यक्तीमत्त्व, स्वभाव आणि तुमची आर्थिक स्थितीही सांगतात. असे समुद्रशास्त्रात म्हटले आहे. 

तर जाणून घेऊ या ओठांबद्दल 

१) गुलाबी ओठ चांगल्या आरोग्याची निशाणी आहे. तसेच तुमच्या सौंदर्याालाही चारचांद लावतात. समुद्रशास्त्रानुसार अशा प्रकारचे ओठ म्हणजे व्यक्ती बुद्धिमान आहे. अशा व्यक्ती आपल्या बुद्धी आणि ज्ञानाने धन आणि मान सन्मान प्राप्त करतात. जिथे असतात तिथे आपली ओळख निर्माण करतात. 

२) ओठांचा आकार सामन्यापेक्षा मोठा असेल तर सूचक करतात की तुम्ही धार्मिक व्यक्ती आहात. ईश्वरालाही तुम्ही मानतात. अशा व्यक्ती अधिक भाग्यवादी आहेत. 

३) तुमचे ओठ प्रमाणापेक्षा मोठे असतील तर तुम्ही रागीट आणि भांडण करणारे आहात. अशा व्यक्ती कोणतेही कारण काढू भांडण करतात. यांच्यात धैर्य कमी असते. अशा लोकांचे मन शांत असते. ते मनात नेहमी उलट सुलट योजना बनवत असतो. 

४) लाल चुटूक ओठ खूप चांगले मानले जातात. समुद्रशास्त्रानुसार असे ओठ तुम्हांला धनवान बनवतात. 

५) पातळ ओठ असलेल्या व्यक्ती नियम आणि कायद्याने चालतात. हे जे पण कार्य करतात ते कार्यकुशलतेने करतात. 

६) ज्यांचे ओठ वाकडे तिकडे असतात त्यांचे जीवन खूप संघर्षमय असते. त्यांना अनेक संकटांना समोरे जावे लागते.