www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘साला... एव्हढी मेहनत केली पण बॅडलक... यश काही हाती लागलं नाही... काम झालं असं वाटत असतानाच थोडक्यासाठी राहीलं... यारSSS’ असे संवाद आपल्या नेहमी कानी पडत असतात. बॅडलक किंवा दुर्भाग्य हे शब्द कधी कधी आपल्या चुका लपवण्यासाठी वापरले जातत मात्र बऱ्याचदा ही परिस्थिती सत्यही असते.
> आपल्या आयुष्यातील ‘बॅडलक’ दूर करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो. पण हे वाटतं तितकं सोप नाही. कारण जेव्हा मनुष्याची वेळ खराब असते तेव्हा स्वतःची सावलीही स्वतःला मदत करत नाही. पण, शास्त्रात काही उपाय सांगितले गेले आहेत ज्याद्वारे हे सहजसाध्य होऊ शकतं...
> नवीन कार्य, व्यवसाय, नौकरी, रोजगार, शुभ कार्याला जाण्यापूर्वी घरातील महिलेने एक मूठ काळे उडीद घेऊन त्या व्यक्तीची दृष्ट काढावी. असे केल्याने प्रत्येक कामात यश मिळेल.
> गरीब, अनाथ, रोगी, भिकारी, तृतीयपंथी यांना दान करावे. शक्य झाल्यास तृतीयपंथीला दिलेल्या पैशातील एक नाणे वापस घेऊन ते नाणे घरातील तिजोरीत ठेवा, असे केल्याने तुम्हाला भरपूर फायदा होईल.
> काळ्या रंगाचे हळकुंड शुभ मुहूर्तावर घेऊन व्यवसाय करणाऱ्या लोकांनी ते आपल्या गल्यात ठेवावे.
> रवी पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर शंखपुष्पीच्या झाडाचे मुळ आणून ते घरात ठेवा.चांदीच्या डबीत ठेवले तर अधिक फायदेशीर आहे.
> गुरुपुष्य किंवा रविपुष्य मुहूर्तावर वडाच्या झाडाचे पान आणून त्यावर स्वस्तिक काढा व ते पान आपल्या घरात ठेवा.
> घरातील मुख्य दारावर श्रीगणेशाची प्रतिमा अशा पद्धतीने लावा कि त्याचे मुख आपल्या घरातील आतल्या बाजूस असेल. सकाळी त्या प्रतिमेला दुर्वा अर्पण करा.
> धन संबंधित कामे सोमवार आणि बुधवारी करा.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.