www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
हिंदू धर्मात दररोज अंघोळ करण्यास सांगितलं आहे. स्वच्छता आणि शुचिर्भूतता यासाठी पहाटे स्नान करावं असं शास्त्रांत सांगितलं आहे. पण अनेक जण आपल्या सोयीनुसार संध्याकाळी अंघोळ करतात. अंघोळ करण्याची नेमकी योग्य वेळ कुठली?
शास्त्रानुसार अंघोळ करणं हा देखील एक विधी मानला गेला आहे. ब्राह्म मुहुर्तावर म्हणजेच पहाटे स्नान करणं हे शुभ असल्याचं म्हटलं जातं. त्याला ब्राह्म स्नान म्हणतात. यावेळी अंघोळ करताना देवाचं नामस्मरण करण्यास सांगितलं आहे. असं करणाऱ्या व्यक्तींवर त्यांच्या कुलदेवतेची कृपा होते. ब्राह्म मुहुर्तावर स्नान करताना सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत आहे. त्यामुळे गुणगौरव होतो.
सकाळी ६ च्या सुमारास दिवस उजाडताना जे स्नान केलं जातं, त्याला ऋषी स्नान म्हटलं जातं. सकाळी सूर्योदयानंतर स्नान करताना भारतातील काही पवित्र नद्यांची नावं घेण्याची पद्धत आहे. या स्नानाला देवस्नान म्हणातात. पूर्वी हे स्नान नदीवर केलं जाई. हे स्नान जीवनातील विवंचना दूर करणारं मानलं जातं.
आजच्या काळात अनेक जण संध्याकाळी अंघोळ करतात. या स्नानाला मात्र शास्त्रांमध्ये दानव स्नान म्हटलं जातं. शास्त्रानुसार ब्रह्म, ऋषी किंवा देव स्नान करावं. दानव स्नान करू नये. रात्रीच्या वेळी स्नान करण्यास शास्त्रांनी मनाई केली आहे. मात्र सूर्य ग्रहण किंवा चंद्र ग्रहण असेल, तर तेव्हा रात्री स्नान करता येऊ शकतं. अंघोळ करतानाही डोक्यावरून अंघोळ करण्यास सांगितलं जातं. त्यामुळे डोक्यातील चिंता दूर होतात.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.